#Yavat ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचा राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार विजय


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दि. २० ऑक्टों रोजी  पिंपरी चिंचवड निगडी या ठिकाणी मीनाताई ठाकरे स्टेडियम यमुना नगर या ठिकाणी  सहावी महाराष्ट्र राज्य बॅडी स्केटिंग( स्केटिंग हॉकी ) राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांचे स्पर्धक सहभागी झाले होते त्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि  पुणे अशा एकूण दहा जिल्ह्याने यामध्ये सहभाग नोंदणी त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या साडेतीनशे व संघ संख्या ५० एवढी होती त्यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यातून ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. मुलांचे तीन संघ व मुलींचा एक संघ या चारही संघाने बाकी सर्व जिल्ह्यांना मागे टाकत सुवर्णपदक पटकावले व राष्ट्रीय पातळीवर ग्रेट स्पोर्ट अकॅडमीच्या संघाची निवड झाली.

यामध्ये आठ वर्षाखालील मुलींचा संघ द्रीशा कुंजीर, मृनाली खंडाळे,
अंजली सुकळे, आरोही चौधरी आणि आदिती भोसले आठ वर्षाखालील मुलांचा संघ
अर्णव कुंभार, स्वरूप शेलार, आयांश दुसाने, रोनक शिंदे, साईराज पाडोळे आणि ऋत्विक कुंभार दहा वर्षाखालील मुलांचा संघ श्रीजीत आहेरकर, साईराज निंबाळकर, वेदांत शेळके, समर्थ निंबाळकर, दिग्विजय दिवेकर, रुद्र गोसावी आणि  सिद्धांत शेळके बारा वर्षाखालील मुलांचा संघ रुद्र आहेरकर, ओम शिंदे,  क्षितिज कुंभार, अंश यादव, अजित पवार, आर्यन कुंभार आणि राजवीर दळवी या चारही ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या पुणे ग्रामीण संघाने सुवर्णपदक मिळवून राज्यात दुसरा क्रमांक मिळवला व संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या मुलांचे कौतुक झाले ही सर्व मुले दौंड तालुक्यातील असून त्यांनी या खेळाचा सराव ग्रेड स्पोर्ट्स अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली केला व राज्य पातळीवरती यश संपादन केले. यांना प्रशिक्षण समाधान दाने सर गणेश घुगे सर आकाश कसबे सर अनुराधा निकम, कांचन नेवसे अर्जुन वाघमारे यांनी केले व तसेच संदीप टेंगले सर विजय टीपुगडे सर व प्रवीण होले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत