Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत उक्ताड पेढे परशुराम बायपास रोड चे भूमिपूजन संपन्न

आ.शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण-गुहागर मुख्य रस्त्याला मिळणार गती


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण शहरातील अतिशय महत्वाचा समजला जाणारा उक्ताड ते पेढे फरशी तिठा रस्ता डांबरीकरण व सुशोभीकरण करणे या रस्त्याचे भूमिपूजन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार शेखर निकम सर यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.ज्यामध्ये ग्रामस्थ,स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
       
शहरातील उक्ताड रोड ते फरशी तिठा हा रस्ता रहदारीचा असून वालोपे रेल्वे स्टेशन ते उक्ताड रस्ता कायम रहदारीचा असून त्याचे काम चांगले व्हावे अशी नागरिकांनी मागणी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली होती.या मागणीवर तातडीने विचार करत आमदारांनी अर्थसंकल्पीय कार्यक्रम अंतर्गत योजनेतून कुंभारखाणी रु.१कोटी ६१ लाखाचा निधी मंजूर केला.उक्ताड व पेढे भागामधील ग्रामस्थांनी आमदारांच्या या ठोस निर्णयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.शहरातील स्थानिक विकासाच्या दृष्टीने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.आमदार शेखर निकम यांच्या या कार्यशैलीमुळे लोकांची कामे तातडीने मार्गी लागतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना गती मिळते.आमदार शेखर निकम यांचे कार्य समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचत आहे.शहरातील गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी दाखवलेला तत्पर प्रतिसाद याचेच उदाहरण आहे.या भूमिपूजनाने अपेक्षांना नवी दिशा मिळाली असून विकासाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे.
      
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी प्रदेश सचिव जयंद्रथ खताते,तालुकाध्यक्ष अबू ठसाळे,माजी नगरसेवक महंमद फकीर,उदय ओतारी,सुधीर भोसले,किसन चिपळूणकर,राम गोरीवले,समीर काझी,कैसर देसाई,सुनील गमरे,आरुषी शिंदे,मोहन शिंदे,इम्रान कोंडकरी,बरकत पाते,खालिद दाभोलकर,संकल्प सुर्वे,तौसिफ़ खलपे,ठेकेदार गणेश कांबळे,आशिक हमदुले,कमाल हमदुले, रुपेश इंगवले, राजेंद्र कदम,सचिन साडविलकर,  पत्रकार विलास गुरव, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments