महादरबार न्यूज नेटवर्क - अंकुश चवरे
ओबीसी चळवळीतून तयार झालेले सर्वसामान्यांचे नेतृत्व गेल्या अनेक वर्षापासून औसा मतदारसंघात सर्वसामान्य जनेतेचे प्रश्न सोडवत मतदारसंघ पिंजून काढत जनतेशी संवाद साधलेले आकाश पुजारी यांना न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडून उमेदवारी जाहीर झाली.
Advertisement
न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर औसा विधानसभा मतदारसंघात युवा, शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, बहुजन ओबीसी समाज आनंदी झाले आहे. आकाश पुजारी यांचा वाढता जनसंपर्क घराणेशाही संपणार अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे. सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य जनतेचा चेहरा म्हणून आकाश पुजारी यांची ओळख औसा मतदारसंघात आहे.
औसा मतदारसंघातील सर्वसामान्य, कष्टकरी, गोरगरीब जनता माझ्यासोबत आहे. सर्व मतदारसंघातील जनतेची चर्चा करून जनतेचा पाठिंबा घेऊन मी विधानसभेची उमेदवारी स्वीकारला आहे. येणाऱ्या काळात विकासाचे मॉडेल या औसा मतदारसंघात दिसेल.
- आकाश पुजारी
विधानसभा उमेदवार, औसा विधानसभा
0 Comments