Hot Posts

6/recent/ticker-posts

#Latur औसा मतदारसंघातील जनतेसाठी निवडणूक लढवणार - आकाश पुजारी

औसा मतदारसंघातील ओबीसी समाजाचा पाठिंबा


महादरबार न्यूज नेटवर्क -
ओबीसी बहुजन समाजाचे नेते आकाश पुजारी यांनी औसा विधानसभा निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार व्यक्त करत गावनिहाय बैठकाद्वारे लोकांशी संवाद साधला. लोकांच्या आग्रहास्तवच आपण विधानसभा निवडणूक लढविणार असून सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्वांची आशीर्वाद पाठीशी राहावीत अशी अपेक्षा आकाश पुजारी यांनी व्यक्त केली.

औसा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघात ओबीसी उमेदवार आकाश पुजारी यांनी गावनिहाय संवाद दौरा केला. तिसरी धर्मनिरपेक्ष आघाडीचे मदनजी रेनगडे पाटील, तिसरी धर्मनिरपेक्ष आघाडीचे मधुशंकर टिळे व्‍यंकटी बुरुड, अंकुश चवरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत लोकांशी संवाद साधत आकाश पुजारी यांनी औसा विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडविण्यासाठीच मैदानात उतरत असल्याचे सांगितले. लोकांच्या कल्याणासाठी सामान्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आतापर्यंत काम केले आहे. यावेळी औसा तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments