Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute नातेपुतेतील लोकमंगल पतसंस्थेमुळे गरीब व्यावसायिकांना फायदा


महादरबार न्यूज नेटवर्क -
लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा नातेपुते या शाखेला तीन वर्ष पूर्ण झालेली असून लोकमंगल पतसंस्थेमुळे आणि गरीब व्यवसायिकांना कर्ज दिल्यामुळे फायदा झाला आहे पतसंस्थेची ठेवी ३.५० कोटी व कर्ज वाटप ७ कोटी झालेले आहे. गरजू तरुणांना व्यावसायिक कर्ज दिल्यामुळे नातेपुते सह परिसरातील अनेक तरुणांनी व्यवसायात उभारी घेतलेली आहे.

समाजामध्ये लोकमंगल पतसंस्थेचे चांगले नाव आहे. तसेच सभासदांना चांगल्या प्रकारे १२.०५% लाभांश दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवीवर १०.५०% व्याजदर आहे. महिलांसाठी चांगल्या प्रकारच्या स्कीमा उपलब्ध आहेत पतसंस्थेतील व्यवस्थापकसह सर्व कर्मचारी वर्ग ग्राहकांना अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देत असल्यामुळे आपुलकीने वागणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नातेपुते सह परिसरातील लोकांना लोकमंगल पतसंस्था आपली पतसंस्था वाटत आहे.

Post a Comment

0 Comments