#Bhor भोर विधानसभा मतदारसंघात इतिहास घडविण्याची संधी - प्रवीण तरडे


महादरबार न्यूज नेटवर्क -
विचार, पार्टी पेक्षा काम करणारा माणूस महत्त्वाचा आहे.इतिहास घडविणारे तालुक्याला भोर विधानसभा मतदारसंघात इतिहास  घडविण्याची संधी येत्या २० तारखेला किरण दगडे पाटील यांच्या रुपाने आली आहे.जनसामान्यांच्या जीवनात गोडवा आणणारी किटली हे चिन्ह असून या चिन्हापुढील बटन दाबून इतिहास घडविणारे साक्षीदार व्हा असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांनी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात केले.
    
तत्पूर्वी शपथ भूमी किल्ले रायरेश्वरावरील स्वयंभू शिवमंदिरात प्रचाराचा शुभारंभ केला.
शिवाजी विद्यालयाच्या क्रिडागंणावर तरडे पुढे म्हणाले की अपक्ष किरण दगडे पाटील यांना निवडून देवून २४ नोव्हेंबरला याच मैदानावर परत जमू आमदार किरण दगडे पाटलाच्या विजयी मिरवणुकीसाठी आणि तो चमत्कार भोर वेल्हा मुळशीत घडविणारे आपण आहात.मुळशीतील  प्रत्येक गावागावात दगडे पाटलांसाठी  माझा लहान भाऊ म्हणून मी त्याच्यासाठी फिरणार आहे.
       
किरण दगडे पाटील काय आहे हे एकदा पुण्यामध्ये येऊन कोथरूडमध्ये फिरा बावधन मध्ये फिरा  तिथल्या झोपडपट्ट्या मधल्या प्रत्येक गरीब बाईला जाऊन विचारा किरण दगडे पाटील कोण आहे ती बाई सांगेल किरण दगडे पाटील माझा भाऊ आहे.
     
या प्रसंगी रायरेश्वर येथे भव्य शिवमंदिर, भोर मधील एम आय डी संधीचा प्रश्न मार्गी लावणार.महिला भगिनींना रोजच दिवाळी वाटेल असे काम करुन दाखविणार असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांनी केले.
   
या प्रसंगी पियुषा दगडे पाटील, राहुल दगडे पाटील, योगेश शेलार,भोर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे, युवा वाॅरीयर तालुका अध्यक्ष रोहन भोसले, भोर तालुका भाजपा उपाध्यक्ष समीर घोडेकर, भोर तालुका भाजपा माजी अध्यक्ष अशोक भागवत, नवनाथ डाळ,  उपाध्यक्ष आकाश दानवले,सुरज चव्हाण, मेघराज सोनवणे,सागर धुमाळ, तुषार बांदल, धनंजय कोंढाळकर, विजय तामकर, संकेत धनावडे, ज्ञानेश्वर बैलकर, माऊली बदक, दत्ता पांगुळ, विलास मालुसरे, प्रवीण चौधरी, विशाल दुसंगे, चंद्रकांत तारु, विजय रेणुसे,मिनानाथ शिवतरे, प्रसाद शेटे, उमेश बारंगळे, बाळासाहेब आवाळे, संदीप बोडके,  महिला उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत