महादरबार न्यूज नेटवर्क - भोलावडे (ता.भोर) येथील राजा रघुनाथ विद्यालयाच्या भव्य मैदानावर कुलदीप कोंडे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला .
ही निवडणूक लढवायची ही गेल्या पाच वर्षांपूर्वी ठरवलेलं होतं.मी या ठिकाणी जनतेच्या आशिर्वादाने निवडणूक लढतोय. भोरच्या विकासासाठी मित्रांनो येणाऱ्या पाच वर्षांमध्ये किमान ५० हजार तरुणांना नोकऱ्या मिळतील अशा पद्धतीचा आम्ही काम करून दाखवू. पन्नास हजार तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळेल तसेच भोर तालुका, वेल्हा तालुका कचरा मुक्त केल्याशिवाय राहणार नाही पर्यावरण संतुलन करीता काम करणार आहे.
पाच वर्षांमध्ये जर तालुक्याचा कायापालट केला नाही तर पुन्हा आपल्या समोर मत मागायला उभा राहणार नाही. सर्वसामान्य गोरगरिबाच्या कार्यकर्त्याकडे केवळ आणि केवळ फक्त पैसे नाहीत म्हणून या ठिकाणी स्थानिकांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आपल्याला तिकिट नाकारल. माझ्याजवळ पैसे नसले तरीसुद्धा ही समोर बसलेली जनता ही माझी संपत्ती आहे ह्या संपत्तीला बाजूला सोडून कधी मी जाणार नाही. माझा कार्यकर्ता हा माझा श्वास आहे माझा कार्यकर्ता ही माझी ताकद आहे त्याला हाताच्या फोडासारखा सांभाळल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा.भविष्यामध्ये काम करत असताना चुकीचे वागलो तर परत मत मागायला आपल्या जवळ येणार नाही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला रिक्षाच्या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन कुलदीप कोंडे यांनी केले.
0 Comments