#Bhor प्रभोलनांना बळी न पडता विकासाला साथ द्या - संग्राम थोपटे
महादरबार न्यूज नेटवर्क -
भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशी तालुक्यातील काशिंग, हाडशी, भालगुडी, वाळेण, कोळवण, डोंगरगाव, होतले, साठेसाई, नांदगाव, चिखलगाव, नाणेगाव, कुळे, दाखणे, चाले, मुगावडे, सावरगाव, करमोळी, दारवली, अंबटवेट, भरे, लवळे, नांदे या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.
यावेळी महादेवआण्णा कोंढरे, माऊली शिंदे, सचिन खैरे, गंगाराम मातेरे, भानुदास पानसरे, तुकाराम आबा टेमघरे, शिवाजी जांभुळकर, अविनाश बलकवडे, रामदास साठे, आंनदा आखाडे, लक्ष्मण आप्पा ठोंबरे, राम गायकवाड, ज्ञानेश्वर डफळ, सविताताई दगडे, सुरेखाताई तोंडे, दिपालीताई कोकरे, स्वातीताई ढमाले, निकिताताई सणस, गौरीताई भारतवंश यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की या भागातील दळणवळणाच्या दृष्टीने प्रमुख असलेले रस्ते पौड- कोळवण - काशिंग - फागणे धरण रस्ता व वळकी नदीवरील मोठया पूलाचे काम करणे यासाठी तब्बल २२ कोटी ५० लक्ष, पौड - दारवली - आंबडवेट - भरे - लवळे रस्ता व लहान पुलाचे काम यासाठी २ कोटी ४८ लक्ष, म्हाळुंगे - नांदे - चांदे - मुलखेड - घोटावडे - चाले रस्ता करणे यासाठी ७ कोटी निधी उपलब्ध करून या रस्त्यांचे काम मार्गी लावण्यात आले.
त्याचबरोबर गावागावातील जोडरस्ते, सभामंडप त्यांचबरोबर पाणी पुरवठा योजना, अंतर्गत रस्ते अशी अनेक विकास कामे आमदार स्थानिक निधी, डोंगरी विकास कार्यक्रम, २५१५, ३०५४, ५०५४, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून कामे मार्गी लावण्यात आली.
त्याच केलेल्या विकास कामांवर, दाखविलेल्या विश्वासावर मुळशीकर जनता, महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे काम करून लोकसभेला संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना मोठे मताधिक्य दिले त्यापेक्षाही अधीक जोमाने काम करीत असून जास्तीचे मताधिक्या मिळवून देतील.
राज्यातील असणाऱ्या खोके सरकार, पक्ष फोडणारे व दलबदलू नेते या सर्वांना सामान्य जनता कंटाळली असून लोकसभेच्या निकालातून स्पष्ट झाल्याचे आपण सर्वांनी ते पहिले आहे त्यामुळे त्यांनी कितीही फसव्या योजना आणल्या वेगवेगळी प्रलोभने दाखवली तरी जनतेला सर्व कळले आहे. सर्व सामान्य मतदार, जनता अश्या गोष्टीना बळी पडणार नाही त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित असल्याने पुढील काळात मुळशी तालुक्यासह मतदार संघाचा विकास अधिक गतीने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment