महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील १९९५ या वर्षी इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थीयांचा गेट टुगेदर चा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. पिलीव परीसरात आठवणी ९५ हया माजी विद्यार्थी संघटनेतर्फे गेल्या दहा वर्षापासून पिलीव परीसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. बाहेरगावी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारे मित्र दर दिपवाळी सणानिमित्त एकत्र येतात.
यावेळी वर्षभर सामाजिक उपक्रम राबविणयासाठी प्रत्येक जण काही रक्कम जमा करतात व यातुन विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी हया आठवणी ९५ ग्रुपचे अध्यक्ष प्रा संजय पाटील उपाध्यक्ष नितीन शिंदे, सचिव सचिन गाटे ,तसेच डॉकटर राजेश चोरमले,अन्टीकरपशन चे संतोष मदने,इस्माईल पठाण सर,योगेश विरकर सर,युवा उद्योजक उमेश देशमुख, अविनाश जेऊरकर, विजय ढेरे,प्रगतशील बागायतदार सुर्यकांत मदने,संतोष जाधव ,राहुल झिंजे,संग्राम पाटील, मधु शिंदे,चंद्रशेखर काळे,विजय सपाटे, योगेश शेंडगे, शंकर देशमुख, राणी गुजरे, यावेळी विविध क्षेत्रात पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. गोल्डन गर्ल म्हणून राणी गुजरे यांचा तर गोल्डन मुलगा म्हणून राहुल झिंजे यांचा सन्मान करणयात आला.
तर पुढील वर्षी वकृत्व स्पर्धा तसेच इतर सामाजिक उपक्रम राबविणयाबाबत सखोल चर्चा झाली. यावेळी सुत्रसंचालन सचिन गाटे सर यांनी केले तर आभार अध्यक्ष संजय पाटील यांनी मानले.
0 Comments