महादरबार न्यूज नेटवर्क - शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज च्या मोरजाई विद्यालय मोरोची येथील २००३ च्या इयत्ता दहावीच्या बॅचचा गेट टुगेदर चा कार्यक्रम ३ नोव्हेंबर रोजी पार पडला. यावेळी या बॅचला शिकवणाऱ्या सर्व सन्माननीय गुरुवर्य शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या बॅचचे कित्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी सरकारी व खाजगी नोकरीला आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून आपापले संसार सुखाने करत असताना कधीतरी एकत्र यावं भेटावं या उद्देशाने हा स्नेह मेळावा ठेवण्यात आला होता. यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक यामध्ये आनंदाचे वातावरण होते पुन्हा नव्या भेटीच्या ओढीने प्रत्येक जण गतकाळातल्या आठवणींना उजाळा देत होते. अतिशय कष्टाने मेहनतीने व संघर्षाने पार करत असलेली आयुष्याची लढाई हे विद्यार्थी करत होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा एक संघ देखील तयार करण्यात आला आहे. आपल्या सोबत उपस्थित नसणाऱ्या व काळाच्या ओघाने ज्यांचा मृत्यू झाला अशा माजी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री धनंजय माने यांनी केले
0 Comments