महादरबार न्यूज नेटवर्क -
येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट अंकित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या ४० विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभर शुद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि १९८ वर्षाची गौरवशाली परंपरा असणाऱ्या चंदूकाका सराफ अँड सन्स् प्रा.लि.बारामती सुवर्णपेढीच्या वतीने गुरुवारी (दि.१२) टी-शर्ट व पॅन्टचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी सुवर्णपेढीचे मार्केटिंग विभागाचे क्लस्टर हेड धनंजय माने, मार्केटिंग प्रतिनिधी विनोद जगताप, सचिन कांबळे , व गजानन बारगजे यांच्या हस्ते कपड्यांचे किट विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी धनंजय माने यांनी चंदूकाका सराफ या सुवर्णपेढीचे इंदापूर येथे नवीन शाखेचे दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार असून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांनी चंदुकाका सराफ या सुवर्ण पेढीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले जाते म्हणून सुवर्णपेढीचे चेअरमन किशोर कुमार शहा यांचे कौतुक केले तर मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.यावेळी विद्यार्थी,शिक्षक,अधीक्षक उपस्थित होते. सदरील उपक्रमासाठी सेल्स हेड श्री दीपक वाबळे मार्केटिंग हेड कुलदीप बावणे व कुमार राठोड यांचे मार्गदर्शन मिळाले.
0 Comments