महादरबार न्यूज नेटवर्क - येथील बाजारपेठ प्रमुख बाजारपेठ असल्याने खरेदी विक्री करण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येत असतात. नातेपुतेचा आठवडी बाजार दर बुधवारी भरत असतो.त्यामुळे या बाजारात माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावातील लोक या बाजार दिवशी येत असतात.तसेच त्यांची शासकीय खाजगी कामे करण्यासाठी येतात परंतु बुधवार दिवशी लोड शेडिंग असल्याने दिवसभर लाईट नसल्याने त्यांची कामे रखडत आहे.त्यामुळे अनेक लहान मोठे व्यवसायाचे अर्थकरण मोठ्या प्रमाणात होत असे हे लक्षात घेऊन महावितरण कंपनी या दिवशी लोड शेडिंग करू नये हा दिवस वगळून अन्य दिवशी लोड करण्यात यावं या मागणीचे निवेदन अण्णा सेना प्रतिष्ठान यांच्या वतीने अभियंता यांना देण्यात आले.
यावेळी अण्णा सेना प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अमित भिंगारदिवे,पैलवान इरफान नदाफ, उमर शेख, पैलवान इमरान मुसा नदाफ, राजू जाधव, संदीप भागवत,मयूर मुलांनी,कैलास बोराटे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
0 Comments