महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघ आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांचे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते, यामध्ये तालुक्यातील बहुसंख्य पत्रकारानी सहभागी होऊन आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
पत्रकारांनी धावपळीच्या युगामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्याचे अध्यक्ष सुनील जगताप यांनी व्यक्त केले.
पत्रकारांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी बोलत होते.यावेळी म्हणाले की पत्रकार नेहमी अन्यायाच्या विरोधात लढत समाजाला न्याय व दिशा देत असतात पत्रकारांच्या हितासाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना यवत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ किशोर पत्की म्हणाले यवत रुग्णालयात मोफत डायलिसिस केंद्र लवकरच सुरू होणार असून त्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा. पुणे जिल्ह्यामध्ये महिलांच्या सामान्य व सिझेर प्रसूती मध्ये जिल्ह्यामध्ये क्रमांक दोन रुग्णालय आहे, असे त्यांनी सांगितले, नियमित चालणे व इतर शारीरिक व्यायाम करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना पत्रकार संघाचे दौंड चे अध्यक्ष संदीप सोनवणे म्हणाले की,दौंड तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य करत असल्यामुळे विविध उपक्रम राबविण्यात सहकार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळभोर, जिल्हा सचिव संदीप बोडखे,विजय काळभोर, जनार्दन दांडगे कार्याध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, संदीप नवले , दौंड तालुका उपाध्यक्ष संदीप भालेराव,राहुल अवचट यांच्या सह दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होत.
0 Comments