महादरबार न्यूज नेटवर्क -
राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध गुणदर्शन स्पर्धांचे प्रशस्तीपत्रक वाटप व भव्य मोफत सायकल वाटप बचत गटांना स्वस्त धान्य दुकान वाटप इत्यादी कार्यक्रम जिजाऊ सावित्रीच्या जयंती निमित्त करण्यात आले.
राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध गुणदर्शन स्पर्धांचे प्रशस्तीपत्र वाटप व भव्य सायकल वाटप हा कार्यक्रम शिवसेनेचे नेते तथा विश्वस्त नातेपुते एज्युकेशन सोसायटी राजकुमार हिवरकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहीगाव येथील श्री श्री ज्ञान मंदिर या संस्थेवर आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी बोलताना सोनियाताई गोरे म्हणाल्या सरकारने आज लाडकी बहीण योजना आणली प्रत्येक कुटुंबाला बहिणीला स्वावलंबी बनवायचा मानस सरकारचा आहे.
ताईंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अध्यात्मावर शाळेने जास्तीत जास्त भर दिला आहे शाळेतील मुलींनी लाटी-काटीचे प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर ताईंनी त्यांचे कौतुकास्पद उद्गार काढून म्हणाल्या की ह्या जर माझ्या लेकिन वर कुणी अन्याय करण्याचा प्रयत्न जरी केला तरी माझ्या लेकी नक्कीच त्या सडेतोड असे उत्तर देतील ताई बोलताना म्हणाल्या की हिवरकर पाटील यांनी गोरगरीब मुलींना वाडी वस्तीवरून शाळेत येण्यासाठी जी पायपीट करावी लागते. त्यासाठी मोफत सायकल देऊन त्यांना शैक्षणिक महामार्ग हा सुखकर केला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच आहे. तसेच याच मुली शैक्षणिक तसेच खेळामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केल्यामुळे आज त्यांना पारितोषिक मिळत आहे त्यांचे पालक सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मुला-मुलींकडे परिपूर्ण असे लक्ष दिले तर नक्कीच भारताची सेवा करण्यासाठी आपल्यातूनच चांगल्या अधिकारी निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
यानंतर मनोगतामध्ये राजकुमार हिवरकर पाटील यांनी सांगितले की लाटी काटी खेळ हा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तर आहेच पण यातून आपल्या घराचं सुद्धा संरक्षण ह्या मुली सावित्रीची लेकी नक्कीच चांगल्या प्रकारे करतील तसेच ज्या मुली रोज पायपीट करून शाळेत वाडीवस्तीवरून चालत येत होत्या त्यांच्यासाठी मोफत सायकल देऊन त्यांना शिक्षणाचा मार्ग अधिक सुखकर करून दिला आहे. तसेच माळशिरस तालुक्यातील विविध अशा गावातील बचत गटांना एकूण २७ रेशन दुकान दिले आहेत त्याबद्दलही त्या रेशन दुकान नातील महिला बचत गटातील महिलांचा यावेळी सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक सामाजिक राजकीय औद्योगिक त्या देशांमध्ये महिलांची शंभर टक्के शक्ती वापरले जाते हिवरकर पाटील साहेबांनी स्त्रियांना मुलींना शिक्षणात मदत होण्यासाठी भव्य सायकल वाटप विविध गुणदर्शन स्पर्धा महिला बचत गटांना रेशन दुकान वाटप आणि त्याचे प्रमाणपत्र देऊन त्यांच्यामध्ये नवीन ज्योत पेटवण्याचे काम केलेल आहे असा उपक्रम सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी राबवला पाहिजे असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुते पोलीस स्टेशनचे महारुद्र परजणे, ऋतुजा ताई मोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील यावेळी महारुद्र परजणे राजकुमार हिवरकर पाटील रणजीत फुले यांचीही मनोगते झाली. यावेळी भाजपचे मनोज जाधव, तेजस गोरे, राष्ट्रवादीचे रियाज शेख, भीमराव फुले, डॉक्टर रणजीत फुले, मुख्याध्यापिका अनिता बनकर, सीमा एकतपुरे सर्व शिक्षक स्टाफ, पोपटराव शिंदे, चेअरमन रंजीत जठार, सनी बरडकर, सतीश बरडकर, सुनील बनकर, अभिजीत चांगण, निलेश ढोपे, संग्राम हिवरकर विद्यार्थी पालक महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
0 Comments