Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute अकलूज बस डेपोसाठी नवीन एसटी बस द्याव्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे शिवसेनेचे राजकुमार हिवरकर पाटील यांची मागणी


महादरबार न्यूज नेटवर्क -
अकलूज बस डेपोसाठी नवीन २० एसटी बस मिळण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे शिवसेनेचे नेते राजकुमार हिवरकर पाटील यांनी निवेदन देऊन मागणी केली. निवेदनामध्ये म्हटले आहे की अकलूज बस डेपोच्या जुन्या झालेल्या जवळपास ४० बसेस आहेत पूर्वी त्या शंभरवर होत्या बसची संख्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांना खेड्या गावावरून येण्यास अडचण निर्माण झालेली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची पर्यटन दर्शन वारी योजना अखंड चालू ठेवण्यासाठी बस उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे तसेच तालुक्यातून नातेपुते परिसरातून शिक्षणासाठी रोजगारासाठी बारामती मध्ये जाणारे हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी महिला पुरुष एसटी बसचा वापर करतात अपुरे असलेल्या बसच्या संख्येमुळे शिक्षण घेणे अवघड झाले आहे तसेच अकलूजच्या जवळ शिखर शिंगणापूर पंढरपूर अक्कलकोट गोंदावले शिर्डी नाशिक त्र्यंबकेश्वर आधी धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी नागरिकांना बस उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी जाणे शक्य होत आहे. माळशिरस तालुक्यात बऱ्याच गावांना एसटी बस सुरू नाही म्हणून ती गावे अजून सुद्धा एसटी बस पासून वंचित आहेत.

तरी आपण निवेदनाचा सकारात्मक विचार करून अकलूज तालुका माळशिरस साठी नवीन २० बसेस उपलब्ध करून देण्यात यावेत  अशी मागणी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments