Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun "अखेर टिकळेश्वर देवस्थान परिसर उजळला!"ग्रामस्थांचे समाधान, आमदार शेखर निकम यांनी विश्वास सार्थ ठरविला

आमदार शेखर निकम यांच्या हस्ते विद्युतीकरणाचे झाले मोठ्या उत्साहात उदघाटन


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
देवस्थान परिसरातील ५० वर्षे प्रलंबित असलेले विद्युतीकरणाचे स्वप्न अखेर साकार झाले. आमदार शेखर निकम यांच्या अथक पाठपुराव्यामुळे हे महत्त्वपूर्ण कार्य मार्गी लागले आणि ४५ लाख रुपयांच्या निधीच्या माध्यमातून परिसरात येरझार विद्युतीकरण झाले. या उदघाटन समारंभात ग्रामस्थ व भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आणि या ऐतिहासिक क्षणी आपले समाधान व्यक्त केले.


आमदार शेखर निकम यांनी या कार्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीचे महत्त्व सांगितले आणि मान्यवरांचे आभार मानले. पालकमंत्री उदयजी सामंत तसेच महायूतीचे सर्व पदाधिकारी यांचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले, ज्यांच्या सहकार्याने या प्रकल्पाला गती मिळाली.

आमदार शेखर निकम यांनी आपल्या मनोगतात देवस्थान परिसरातील लोकांच्या भावनांना आणि अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी या विद्युतीकरणाच्या कार्याला एक नविन आशा आणि एकात्मतेचे प्रतीक मानले. या कार्याच्या माध्यमातून आपल्या भक्तांच्या सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. भविष्यात असाच विकास होईल आणि येथे अधिक चांगले कार्य होईल,असे त्यांनी सांगितले.

टिकळेश्वर परिसराच्या ग्रामस्थांना आणि भक्तगणांना हे विद्युतीकरण एक नविन ऊर्जा देईल, असाच विश्वास त्यांना आहे. देवस्थानाच्या परिसरात आता रात्रीसुद्धा उज्ज्वलतेचा अनुभव घेता येईल, आणि हे सर्व भक्तांच्या एकजुटीचे आणि आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याचे प्रतिक आहे.

यावेळी रोहनजी बने, बाळुशेठ ढवळे, वैभव पवार, नितिन भोसले, हुसेन बोबडे, मंगेश बांडागळे, राजा भेरे, बाळच्या भेरे, भिकाजी बुवा चौगुले, संतोष कतळकर, सुभाष भायजे, सुभाष भोबसकर, बापू बडवे, राजू वाणकुंद्रे, सहाय्यक अभियंता सतीश कोकरे, ठेकेदार राहुल टाकाळे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते आणि भक्तगण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments