Hot Posts

#Alandi ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल मध्ये महिला दिन उत्साहात संपन्न....


महादरबार न्यूज नेटवर्क -
मुक्तादेवी शिक्षण प्रसारक मंडळ व पद्मावती देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल आळंदी येथे ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या विद्यमान सभापती संजीवनी कापरे व संदीप पाटील आणि महेश गोपाळराव खिलारी उपस्थित होते.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, कार्यकारी संचालक यज्ञकांत ढगे , दत्तात्रय बांडे, संचालिका कीर्ती घुंडरे, व्यवस्थापक विजय धादवड,मुख्याध्यापिका प्रीती उंबरकर, लिपीक अक्षय चपटे व सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली. प्रस्ताविक निकिता चौधरी यांनी केले. तर साधना वाघमारे व गीता पारडे या शिक्षकांनी तर अक्षरा आघाव, ऋतुजा भारंबे या विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. शामबाला यादव या पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांना पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या व विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट प्रयोग सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. तसेच झेप रंगांची चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी सर्व महिला शिक्षिका व पालक यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली देशमुख यांनी केले. तर आभार अमृता कांबळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments