Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun शृंगारपूरच्या भैरी भवानी मंदिराच्या सभामंडपासाठी १५ लाखांचा निधी मंजूर

सुर्वे परिवारासह ग्रामस्थांनी मानले आ. शेखर निकम यांचे आभार


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
शृंगारपूर भैरी भवानी मंदिराच्या सभामंडपासाठी १५ लाखांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी दिलेला शब्द पाळत, प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आहे. यामुळे भाविकांची, ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली आहे.

सुर्वे बंधूनी बांधलेले भव्य भैरी भवानी मंदिर हे गावाची श्रद्धास्थान असून, सामूहिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. सभामंडपाच्या उभारणीसाठी मंजूर झालेला निधी ग्रामस्थांच्या सेवेसाठी मोलाचा ठरणार आहे.

आमदार शेखर निकम यांनी जनतेच्या विकासासाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. विकासकामांचा पाठपुरावा करत प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे आणि निधी मंजूर करणे, हे त्यांच्या नेतृत्वाचे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे.

यापूर्वी अनेक विकास प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी करत आमदार निकम यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला आहे. भैरी भवानी मंदिरासाठी मंजूर झालेला १५ लाखांचा निधी हा याच सातत्याचा एक भाग आहे.

ग्रामस्थ व सुर्वे परिवार यांनी
निधी मंजुरीच्या घोषणेनंतर शृंगारपूर गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी व सुर्वे परिवार आमदार निकम यांचे आभार मानत, "मनातील प्रश्नांना आवाज देणारे नेतृत्व म्हणजे आमदार शेखर निकम" अशी भावना व्यक्त केली.

प्रशासकीय मान्यता मिळाल्याने सभामंडप उभारणीच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. मंदिर परिसर अधिक सुशोभित आणि सुविधायुक्त करण्यासाठीही पुढील योजना हाती घेतल्या जातील.

शृंगारपूरसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातील विकासाची घोडदौड अशीच सुरू राहणार असून, आमदार शेखर निकम यांचे जनतेसाठी असलेले योगदान प्रेरणादायी ठरत आहे.

Post a Comment

0 Comments