महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील जळभावी गावचे अण्णासाहेब सुळ यांना नुकताच महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार युवा महाराष्ट्र फाऊंडेशन पुणे यांचेकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींना दिला जातो. अण्णासाहेब सुळ यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. अण्णासाहेब सुळ यांनी हॉटेल व्यवसाय, विट उदयोग,पाणी कमी असताना भरघोस उत्पन्न, शेळी पालन व मेंढी पालन व्यवसाय अश्या व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी हे सर्व व्यवसाय जनसेवा उदयोग समुहाच्या वतीने उभा केले आहेत. गावगाडयात काम करीत असताना युवकांना प्रेरीत करुन त्यांना प्रोस्तहान देत व मार्गदर्शन करीत व्यवसाय करण्यासाठी प्रवृत करणे .
सदरचा पुरस्कार त्यांना ११ मार्च रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह पुणे याठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. आण्णासाहेब सुळ यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन त्यांंचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
0 Comments