Hot Posts

6/recent/ticker-posts

#Karunde नाथाच्या घोड्याचं चांगभलच्या गजरात यात्रा संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क -
श्रीनाथ यात्रा कारूंडे तालुका माळशिरस येथील श्रीनाथ यात्रा उत्साहात तसेच मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाली.


श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने यात्रा उत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.
या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे नाथपंथी डवरी गोसावी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रसह इतर राज्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्रीनाथ साहेबांचा छबिना मंदिरातून पहाटे पाच वाजता निघून दुपारी बारा वाजता देव घरी पोहोचला.
यावेळी मानाच्या काठ्या छबिना पालखीच्या पुढे होत्या यावेळी भाविकांकडून खूप मोठ्या प्रमाणात गुलाबाची उधळण करण्यात आली.

कारूंडे ग्रामपंचायत च्या वतीने ठिकठिकाणी लाईट व्यवस्था, पाणी व्यवस्था नळाद्वारे तसेच तीन टँकरद्वारे करण्यात आले होते. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून  स्वच्छता उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आली होती.
यासाठी सरपंच नंदाताई नामदास, उपसरपंच सूर्यकांत पाटील, ग्रामसेविका आतार मॅडम तसेच सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
ग्रामपंचायत कर्मचारी श्रीमंत वाघमोडे ,महादेव गायकवाड, नाना रुपनवर यांनी परिश्रम घेतले.

आरोग्य विभागाकडून कारूंडे उपकेंद्र येथे एक बूथ तसेच मंदिर परिसरात एक बुथ सुरू करण्यात आला होता. आरोग्य विभागाकडून २२ कर्मचारी तसेच एक ॲम्बुलन्स उपलब्ध करण्यात आली होती.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

श्रीनाथ यात्रा उत्सव  देवस्थान अध्यक्ष दादासो भगत तसेच सर्व ट्रस्टी तसेच यात्रा कमिटी अध्यक्ष ट्रस्ट तसेच ग्रामस्थ यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Post a Comment

0 Comments