महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते येथील प्रगतशील बागातदार श्री अभिजीत दिलीप घुगरदरे यांनी शरयू साखर कारखाना कापशी तालुका फलटण या कारखान्यास गळीत हंगाम सन २०२४-२५ साठी सर्वाधिक जास्त ऊस दिल्याने शरयू साखर कारखान्याचे वतीने चेअरमन
श्रीनिवास पवार (बापू) त्यांच्या हस्ते अभिजीत घुगरदरे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी श्रीनिवास पवार (बापू) चेअरमन शरयू साखर कारखाना, युगेंद्र पवार मॅनेजिंग डायरेक्टर तसेच शर्मिला पवार संचालिका यांच्या हस्ते कारखाना स्थळावरती सन्मान करण्यात आला.
यावेळी घुगरदरे यांच्या प्रयोगशील शेतीचे कौतुक करण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या गळीत हंगामामध्ये घुगरदरे यांनी आपल्या शेतीमध्ये उसाची लागण तसेच खोडव्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करून पाण्याची योग्य नियोजन तसेच लागणारे मेहनत मशागत खताच्या योग्य मात्रा देऊन ऊस उत्पादनात दरवर्षी एकरी ११० ते ११५ टन ऊस उत्पादन घेतात त्यांच्या या नियोजनाचा अन्य शेतकऱ्यांना सल्ला व मार्गदर्शन नक्कीच फायद्याचे ठरणार आहे.
अभिजीत घुगरदरे यांचा शरयू साखर कारखान्याने सन्मान केल्याने नातेपुते , धर्मपुरी सह परिसरातील शेतकऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
शरयू साखर कारखान्याचे शेती विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मला ऊस तोडणी यंत्रणा वेळेत दिल्याने मी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस देऊ शकलो.
अभिजीत घुगरदरे प्रगतशील शेतकरी.
0 Comments