Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun कोकणातील कृषी क्षेत्र अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाने विकसित करण्याच्या दृष्टीने आ. शेखर निकम यांची शरद पवारांशी भेट



महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात AI (Artificial Intelligence) सेंटर स्थापन करण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या महत्त्वपूर्ण बैठकीच्या निमित्ताने आमदार शेखर निकम यांनी शरद पवार यांची भेट घेऊन या पुढाकाराचे मनःपूर्वक स्वागत केले.
   
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात AI (Artificial Intelligence) सेंटर स्थापन करण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत कृषी उत्पादनवाढ, जलसंपत्ती व्यवस्थापन, हवामानानुसार स्मार्ट शेती तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल यावर विधायक चर्चा झाली.
   
कोकणातील शेती मुळातच सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. कोकणातील शेतकऱ्याचे उत्पन्न हे बेभरवशाचे असते. तेथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर निश्चितच त्यांची प्रगती होईल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल.
    
आ. शेखर निकम यांनी नेहमीच कोकणातील प्रत्येक व्यावसायिक घटकाचा विचार करून त्याच्या वाढीसाठी सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यात शेतकरी आणि शेती हा तर त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे शेतकरी राजाचा विचार करून आ. निकम यांनी कोकणात अत्याधुनिक AI तंत्रज्ञान आधारीत शेती व्यवसाय विकसित करण्याच्या अनुषंगाने पवार यांच्या बैठकीस उपस्थित राहत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात AI (Artificial Intelligence) सेंटर स्थापन करण्याच्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत केले.

Post a Comment

0 Comments