Hot Posts

6/recent/ticker-posts

#Karunde जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढे वस्ती शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उस्फूर्तपणे साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढेवस्ती( कारूंडे) शाळेमध्ये शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव म्हणून मोठ्या उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करावयाचे असल्याने शालेय परिसर रांगोळी काढून ,आंब्याचे तोरण बांधून ,फुगे लावून  आकर्षक सजवण्यात आलेला होता . त्यानिमित्ताने शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आलेली होती

पहिल्या दिवसाची सुरुवात झाली ती शाळेच्या प्रभात फेरीने ,यावेळी नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना बर्थडे टोपी,  हातामध्ये फुगे देऊन, त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रभात फेरी नंतर शाळेच्या प्रवेशद्वारावरच नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण शाळेतील सहशिक्षिका निकम मॅडम व अंगणवाडीच्या शिक्षिका जाधव मॅडम यांनी केले. 

विद्यार्थ्यांच्या पावलांचे ,शाळेतील पहिले पाऊल, पायाचे ठसे घेऊन व त्यांना गुलाब फूल देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालकही उपस्थित होते.


शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन लोंढे वस्तीवरील पालक राजेंद्र वायाळ, युवराज गोसावी, मदन गिरी, संज्योत लोंढे ,रामचंद्र शेंडगे ,नितीन गोसावी , स्वप्नजीत पवार,या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी महिला पालकही उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या होत्या. फोटो प्रतिमा पूजनानंतर नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्याचे किट व मोफत पाठ्यपुस्तक आणि गणवेशाचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले .त्याचबरोबर इतर उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके , मोफत गणवेश याचे वाटप करण्यात आले. पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या नावाचे कार्ड ओळखपत्र म्हणून सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होते. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन, चॉकलेट वाटप करून आणि मान्यवरांचे आभार मानून शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 दुपारच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना स्वादिष्ट असे गोड जेवण देण्यात आले. शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमासाठी अंगणवाडीच्या जाधव मॅडम त्याचबरोबर लोंढे मॅडम आणि शाळेतील सहशिक्षिका निकम मॅडम, पालक, माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments