महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते येथील पालखी तळाची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी करून येथे मुक्कामच्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही. सर्व सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासना कडून तयारी सुरु असून दरम्यान सोहळ्यात येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग, तळ, मुक्काम या ठिकाणी सुविधा देण्यासाठी प्रशासन कटिबद आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह, लाईट, पाणी, शौचालय, हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे.
याचवेळी कारूंडे येथील विसावा ठिकाण,धर्मपूरी येथील स्वागत कक्ष यांची पहाणी केली.
यावेळी माजी आमदार रामभाऊ सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपनगराध्यक्ष अतूल पाटील, जेष्ठ नगरसेवक अॅड. भानूदास राऊत, प्रांताधिकारी विजया पांगारकर, पोलिस उपअधिक्षक नारायण शिरगांवकर, सपोनी महारूद्र परजणे, तहसीलदार सुरेश शेजूळ, नायब तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, मूख्यकार्यकारी अधिकारी विकास शिंगाडे, राजेद्र पांढरे, सतिश सपकाळ,अक्षय भांड, राजाभाऊ हिवरकर, देवीदास चांगण,नंदू लाडगे, संजय मामा उराडे,अमित चांगण, शशीकांत बरडकर, अर्जून पिसाळ. तसेच पंचायत समिती, नगरपंचायत, महावितरण व संबधित अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते. धर्मपुरी राजुरी टोलनाक्यावरती आषाढी वारीसाठी व प्रस्थानासाठी देहू व आळंदीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सर्व वाहनांना टोल माफी मिळावी
सोलापूर जिल्ह्यातून शेजारील मराठवाडा विदर्भ तसेच सर्व तालुक्यासह कर्नाटक राज्यातून आषाढी वारीच्यानिमित्त श्री क्षेत्र देहूला व श्री क्षेत्र आळंदीला जाण्यासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात यावी. अशी मागणी वारकरी भाविकांच्या वतीने करण्यात आली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान दि. १८ जून रोजी तसेच कैवल्य चक्रवर्ती सम्राट संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान दि.१९ जून रोजी असून. दि. १५ जून ते २० जून पर्यंतच्या कालावधीमध्ये वारकऱ्यांची वाहने देहू व आळंदीकडे प्रस्थान होतील या दरम्यान वारकऱ्यांच्या सर्व वाहनांना सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी राजुरी या ठिकाणी टोलनाक्यावरती टोल माफी मिळावी. श्रीराम महाराज भगत नातेपुते नातेपुते परिसर दिंडीचे प्रमुख.
0 Comments