महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पन करून सदर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी हुतात्मा परिवार व वीर पत्नी माता यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आमदार शेखर निकम यांनी जयहिंद फाऊंडेशन मार्फत शहीद सैनिक आणि त्यांच्या कुटुंब कल्याणासाठी सामाजिक कार्य केले जाते त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले व शहिद कुटुंबांच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या. भारतीय लष्कर, भाराताचा प्रत्येक सैनिक हे भारताच्या शौर्य, धैर्य, त्याग आणि अटल देशभक्तीचे जिवंत प्रतीक आहे. त्यांचे त्याग आणि देशासाठी केलेले अढळ समर्पन आपल्याला प्रत्येक क्षणी अभिमानाने भरून टाकते असे गौरोद्गार आमदार निकम यांनी यावेळी काढले, जयहिंद फाऊंडेशन यांच्या वतीने शहिद सैनिकांच्या कुटुंबासाठी आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम व राबविण्यात येणारे उपक्रम हे एकप्रकारे शाहिद सैनिकांसाठी मानवंदनाच आहे असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी या सन्मान सोहळ्यात केले.
यावेळी वसंत मोरे (ज्येष्ठ इतिहास संशोधक), कॅप्टन (मानद) शंकरराव पाटील, जयहिंद फाऊंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल अनपट, राष्ट्रीय सचिव हनुमंत मांढरे, राष्ट्रीय संचालक केशव राजपुरे, शहिद कुटुंबातील सदस्य, मान्यवर आदी उपस्थित होते.
0 Comments