Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras करांडेवस्ती येथे ताबडतोब शिक्षक नेमण्याची गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करांडेवस्ती ही पहीली ते चौथीपर्यंत वर्ग असणारी शाळा आहे. मात्र याठिकाणी नियमानुसार दोन शिक्षकांची नियुक्ती आहे परंतु याठिकाणी असणाऱ्या एका शिक्षकाची मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाल्यामुळे सध्या एकच शिक्षक आहेत. याठिकाणी जवळपास ३७ विदयार्थी शिक्षण घेत असुन चार वर्गाला एकच शिक्षक असल्याने  विद्यार्थ्यांचे प्रचंड मोठे शैक्षणीक नुकसान होत आहे.

याठिकाणी ताबडतोब दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष प्रमोद भैस, उपाध्यक्ष सतिश करांडे, सदस्य हणमंत भिसन, सागर भैस ,शरद मदने व पालक राजेंद्र बगाडे, दादा मदने व इतरांनी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व‌ गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.    

 पिलीव बिटच्या विस्तार अधिकारी नकाते मॅडम यांनी याठिकाणी ताबडतोब शिक्षक देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

        

Post a Comment

0 Comments