Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute शिवसेनेच्या ओबीसी जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर पाटील


महादरबार न्यूज नेटवर्क -
शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री.मा ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन  मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेश जी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय येथे जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून नातेपुते येथील शिवसेना नेते श्री. राजकुमार शंकरराव हिवरकर पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने ५५ सायकलींचं मोफत झालेलं  वाटप,  सवलतीच्या दरात  ९९,००० माता-भगिनी ना केलेली डाळ वाटप. सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली रेशन दुकान, ३८,००० महिलांचे आरोग्य तपासणी, किशोरवयीन  मुलींची हिमोग्लोजन तपासणी तसेच मोफत उपचार शिबिरे, ओबीसी साठी केलेलं महत्त्वपूर्ण संघटन याची दखल घेत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांनी सोलापूर विभागाची जबाबदारी राजकुमार हिवरकर पाटील यांच्याकडे दिली. मा.ना भरत शेठ गोगावले यांनी निवडीचे पत्र देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दिलेल्या संधीचं सोनं करून पुढील काळात ओबीसी विचारधारा शिवसेनेशी जोडण्याच निश्चित काम करणार  असल्याचे राजकुमार हिवरकर पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments