Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute राम सातपुते लवकरच सभागृहात दिसतील - ना. संजय शिरसाट

ना.संजय शिरसाट व ना.भरत गोगावले यांची सातपुते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व रोजगार हमी विभागाचे मंत्री भरत गोगावले यांचा नुकताच माळशिरस दौरा झाला या दौऱ्या वेळी त्यांनी तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांच्या निवासस्थानी भेट दिली भेटी दरम्यान साथ होते यांनी शिरसाट व गोगावले यांचा यथोचित असा सन्मान केला.


यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन म्हणून शिरसाट म्हणाले की राम सातपुते लवकरच माजी नसून विद्यमान आमदार म्हणून आमच्या सोबत सभागृहात दिसतील तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळचे असला तरी मी सुद्धा त्यांच्या जवळच आहे त्यामुळे मला चांगलंच माहित आहे आपण लवकरच सभागृहात असणार आहात.

तुम्ही जे मागाल व जे माझ्या हातात आहे ते तुम्हाला देणार सातपुते यांनी यावेळी केलेली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची मागणी शिरसाट यांनी तात्काळ मान्य केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह मुलींचे वस्तीगृह दहा कोटी व मुलांच्या वस्तीग्रास दहा कोटी रुपये देतो आपण पाठपुराव करावा असे आश्वासन शिरसाठ यांनी दिले.

गोगावले म्हणाले की आपण महायुतीमध्ये आहे त्यामुळे सर्वाना सोबत घेऊन कामे केल्यास आपल्याला अडचण येणार नाही आमच्या कार्यकर्त्यांनाही थोडीशी संधी द्या.  सर्व ती मदत आपणास करण्यास मी तयार आहे.


यावेळी माजी आमदार राम सातपुते माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, बाजीराव काटकर, हनुमंत (बापू) सुळ, सुजय माने पाटील, संजय देशमुख, बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, नितीन मोहिते, गणेश पाटील, सतिश सपकाळ, राजभाऊ हिवरकर, मिलींद सरतापे सोमनाथ भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पद्मन यांनी केले तर आभार अँड शरद मदने यांनी मानले.

Post a Comment

0 Comments