महादरबार न्यूज नेटवर्क -
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती तथा ७५० वा जन्मोउत्सव वर्ष आहे. माऊलींचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमी,शके ११९७. इ. स. १२७५ रोजी झाला. येत्या गोकुळ अष्टमीला अर्थातच १५ ऑगस्ट रोजी संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर माऊली महाराजांची ७५० वी सप्तशतकोत्तर जन्मोउत्सव
आहे.
यापार्श्वभूमीवर सन २०२५ हे वर्ष सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त म्हणून साजरा करण्याबाबतचे परिपत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने जारी केले आहे. या शासन निर्णयाचे समस्त वारकरी संप्रदाय, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीसह वारकरी भाविकांच्या कडून स्वागत करण्यात येत आहे.
या अनुषंगाने येत्या १५ ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक गाव नगर व शहरांमध्ये महानगरपालिका, तसेच नगरपरिषदा व नगरपंचायती यांनी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा किंवा मुर्तीची पालखीतून टाळ मृदुंगाच्या जयघोषात मिरवणूक काढून हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा आदेश जारी केला आहे. उपरोक्त नमूद सूचनांची सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्याबाबत योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
गावोगावी माऊलींचा जन्मोत्सव सप्तशतकोत्तर उत्सव पुजनासह पालखी मिरवणुक हा सरकारचा निर्णय हा उत्सव प्रत्येक गावामध्ये १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत साजरा होणार असून सर्व भाविकांनी सहभागी होऊन यांचा लाभ घ्यावा हा सोहळा भाविकासह वारकरी संप्रदायासाठी आनंदोत्सव आहे. भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि माउलींच्या जन्माची तिथी एकच आहे. या उत्सवामध्ये सायंकाळी प्रत्येक भाविकांनी आप आपल्या घरी बालकृष्णांची व माऊलींची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करून सहपरिवार षोडशोपचार पूजन करून धूप दीप उजळावे फळे पुष्प नैवेद्य अर्पण करून ग्रंथपारायण, हरिपाठ, नामस्मरण, अभंग म्हणून पुष्पवृष्टी करून दीपोत्सव करुन आरती करावी व या ऐतिहासिक सोहळ्याचां भाविकांनी
आनंदोत्सव साजरा करावा.
हा सोहळा भक्तीपर वातावरणामुळे समाजात अध्यात्मिक व सांस्कृतिक जागृती निर्माण होणार आहे,
ही उत्सवसंध्या महाराष्ट्रातील संत परंपरेचा गौरव वाढवणारी ठरणार असून तरुण युवकांमध्ये संत विचारांची प्रेरणा देणारी ठरेल, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाला तत्त्वज्ञानाची बैठक दिली. अध्यात्मज्ञानाचा पाया घातला. या भक्कम पायावरच वारकरी संप्रदायाची इमारत आज ७५० वर्षे उभी आहे.
श्रीराम महाराज भगत.
नातेपुते परिसर दिंडी प्रमुख
नातेपुते परिसर दिंडी प्रमुख
0 Comments