महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव बाल दिनाचे औचित्य साधत वनाझ परिवार विद्यामंदिर कोथरूड, पुणे या शाळेत आनंद मेळावा उत्साहात व जल्लोषात पार पडला.
शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका आनिताताई दारवटकर यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण कार्यक्रमाचे शिस्तबद्ध असे नियोजन करण्यात आले.कार्यक्रमात विविध बौद्धिक व शारीरिक गोष्टींचा विचार करून विविध खेळ वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक पदार्थांचे स्टॉल , ज्वेलरी, कपडे यांचे स्टॉल पालकांनी व विद्यार्थ्यांनी लावले .
खाद्यपदार्थांच्या स्टॉलने तर कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली सर्व बालचमू, पाहुणे ,पालक वर्ग यांनी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला व वेगवेगळे खेळ खेळण्यात ते रममाण होऊन गेले. प्रत्येक स्टॉलवर ग्राहकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली.त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर पालक ग्राहकही खूप खुश झाले. कार्यक्रमासाठी अष्टपैलू असणारे विद्यार्थ्यांच्या समवयस्क असणारे पाहुणे बालचमू अरिष कदम हे लाभले.त्यामुळे विद्यार्थ्यांना खूपच आनंद झाला . त्यांच्यामुळे कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक प्रीतम दिवटे व आभार प्रदर्शन मंगल थरकुडे यांनी केले.
कार्यक्रमाचे उत्तम असे नियोजन सांस्कृतिक समितीचे शिक्षक व सर्व सहकारी शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. कार्यक्रमाला सर्व मुलांचा पालकांचा तसेच काही आमंत्रित पाहुण्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभला . संपूर्ण कार्यक्रम जल्लोषपूर्ण वातावरणात आनंदात पार पडला.
0 Comments