महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल माखजनमधील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी रिया रितेश गोटेकर हिला चतुरंग प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा मानाचा गोडबोले पुरस्कार जाहीर झाला आहे. ट्रॉफी, प्रशस्ती पत्रक, एक हजार रुपये रोख,पाचशे रुपयाची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
'चतुरंग प्रतिष्ठान' तर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी शनिवार व रविवार दि. १३-१४ डिसेंबर रोजी ५९ कोकण शाळांतील एकूण २४५ विद्यार्थ्यांचे ग्रुप इंटरव्ह्यू पार पडले. या विद्यार्थ्यांमधून ३६ शाळांतील ३६ विद्यार्थ्यांची निवड सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. या मुलाखतीसाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून भगीरथ संस्थेचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर, डॉ. मिलिंद गोखले आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. वैभव कानिटकर यांनी काम पाहिले. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणाऱ्या सोहळ्यामध्ये पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत.
रिया गोटेकर हिने विविध क्रीडा स्पर्धेत जिल्हा, विभाग, राज्य स्तरावर उत्तम कामगिरी केली आहे.
या यशाबद्दल अध्यक्ष किशोर कुमार साठे मुख्याध्यापक महादेव परब यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
0 Comments