महादरबार न्यूज नेटवर्क -
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये वाठार निंबाळकर गटातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी कॅबिनेट मंत्री श्री. महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरवडी गावचे सुपुत्र आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेते विशाल बापू माडकर निवडणूक लढवणार आहेत.उच्चशिक्षित, सुसंस्कृत व अभ्यासू शांत संयमी युवा नेते म्हणून वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत.वाठार निंबाळकर गटातून युवा वर्गातून तसेच जेष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, श्रमिक जनतेमधून युवा नेते विशाल बापू माडकर यांना निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा मिळत आहे.
वाठार निंबाळकर गटातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी कॅबिनेट मंत्री श्री महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरवडी गावचे सुपुत्र आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेते विशाल बापू माडकर यांना युवकांच्या वाढत्या पाठींब्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
युवा नेते विशाल बापू माडकर निवडणूक पार्श्वभूमीवर म्हणाले की,मी वाठार निंबाळकर गटातून जनतेचा,गोर गरीब सामान्य शेतकरी ,शेतमजूर, कामगार कष्टकरी ,श्रमिकांच्या जनतेमधून लोकांच्या मनातील उमेदवार आहे.वाठार निंबाळकर गट विकासाचे रोड माॅडेल बनवणार आहे.देशातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील विकासाच्या कामांना प्राधान्य देऊन पारदर्शकता, नैतिकता, लोकहिताची लोककल्याणकारी ,जनकल्याणासाठी विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करुन पाच वर्षांत गावागावात वीज, पाणी ,रस्ते ,शिक्षण आरोग्य ,रोजगार ,पर्यावरण, कृषी ,उद्योग व्यवसाय याची निर्मिती व लोककल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी दिशादर्शक प्रामाणिकपणे निष्ठेने प्रयत्न करणार आहे.जनतेच्या हितासाठीच माझी उमेदवारी जाहीर केली आहे.जनता हिच माझे दैवत आहे.मायबाप जनतेच्या समस्या मी घरोघरी जाऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करणार हिच आमची प्रतिज्ञा आहे.
भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी कॅबिनेट मंत्री श्री.महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली वाठार निंबाळकर गटात विकासाची कामे जिल्हा परिषद, राज्य, केंद्र, स्वयंसेवी संस्था, मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी, आमदार व खासदार निधी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर संस्था व्यक्ती शासन यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची तरतूद करुन वाठार निंबाळकर जिल्हा परिषद गटातील महिला बचत गट,युवा रोजगार, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, लघुउद्योग, कुटिरोद्योग, कृषी उद्योग, कृषी पुरक उद्योग, कृषी पर्यटन, वीटभट्टी,सोलर पॅनल,सोलर वॉटर पार्क, सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी युवा रोजगार संस्था, शेतकरी शेतमजूर भवन, विद्यार्थी वसतिगृह, पत्रकार भवन, महिला बचत गट भवन,युवा रोजगार भवन या माध्यमातून विकासाची साखळी निर्माण करुन लोकांच्या हाताला काम व शेतीला पाणी, शेतीमालाला विक्री व्यवस्था अशा पातळीवर गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानून प्रामाणिकपणे यशस्वीपणे काम करणार आहे.माय बाप जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या हिताच्या सर्वसमावेशक योजना राबविण्याचे ध्येय राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेते विशाल बापू माडकर यांनी मनाशी पक्की खूणगाठ बांधून ठरवले आहे.
0 Comments