Hot Posts

6/recent/ticker-posts

#Morochi मोबाईलपासून दूर राहा आणि अभ्यासात सातत्य ठेवा - प्रदीप गोरड

महादरबार न्यूज नेटवर्क -

मोरजाई विद्यालय मोरोची विद्यालयात नवीन वर्षाच्या निमित्ताने श्री प्रदीप गोरड साहेब,नूतन डीवायएसपी यांचे मी कसा घडलो हे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते.


व्याख्यानाच्या प्रारंभी त्यांनी विद्यार्थांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मी कसा घडलो या विषयावर विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील बालपणापासून ते आजपर्यंतचा संघर्षमय प्रवास सांगितला.जिद्द,चिकाटी,सातत्य आणि शिस्त असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळते.मी ही सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा असून माझे आई वडिल अशिक्षित असून त्यांनी मला शिक्षणासाठी काहीही कमी केले नाही.विद्यार्थानो आपल्य आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करा.मोबाईलपासून दूर राहा आणि अभ्यासात सातत्य ठेवा तुमच्यापैकी कोणी भविष्यात अधिकारी व्हाल,डॉक्टर व्हाल,इंजिनिअर व्हाल,वकील व्हाल,चांगले व्यावसायिक व्हाल.आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत चालली तरी आपण व्यसनापासून दूर राहा.दररोज लवकर उठा व्यायाम करा,अभ्यास करा असे प्रेरणादायी विचार मांडले.


त्यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास सुर्यवंशी सर,श्री दुर्योधन गोरड,पर्यवेक्षक श्री जगन्नाथ भुजबळ सर,शिक्षक प्रतिनिधी श्री किशोर जाधव सर,श्री हनुमंत माने सर,श्री दादासाहेब हुलगे सर,सौ सुनंदा पाटील मॅडम  यांच्यासह विद्यालयातील शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments