Hot Posts

6/recent/ticker-posts

#Morochi ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

महादरबार न्यूज नेटवर्क - 
ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची येथे मराठी पत्रकार दिन  उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रय निटवे, मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील,उपमुख्याध्यापक जिलानी आतार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमास पत्रकार  पत्रकार लतीब नदाफ,दत्तात्रय नाईकनवरे,  श्रीकांत बाविस्कर, विलास भोसले, आनंद लोंढे, हनुमंत माने, मनोज राऊत, समीर सोरटे व संदीप माने यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

याप्रसंगी शाळेच्या वतीने मान्यवर पत्रकारांचे सत्कार करण्यात आले यावेळी पत्रकार लतीब नदाफ सुनील राऊत, श्रीकांत ,बाविस्कर ,समीर सोरटे, विलास भोसले यांनी विद्यार्थ्यांना न्युज पेपर बद्दल माहिती व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले.

शाळेचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रय निटवे यांनी याप्रसंगी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत शाळेविषयी माहिती दिली. 

शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील  यांनी पत्रकारांचे महत्त्व अधोरेखित करत पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
     
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पत्रकारितेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख सुनंदा पवार व मनीषा सूळ  यांनी केले.

Post a Comment

0 Comments