Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute नातेपुते येथे श्री दत्त प्रतिष्ठान च्या वतीने पत्रकारांचा सन्मान

महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते येथील श्री दत्त प्रतिष्ठान नातेपुते आयोजित पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध दैनिकाचे नातेपुते प्रतिनिधी पत्रकार बांधवांचा सन्मान व परिसंवाद उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला 
या कार्यक्रमासाठी प्रमुखातिथी म्हणून  गणेशबापू उराडे विनायकजी उराडे, राहुलशेठ पद्मन, डॉ वैभवदादा कवितके या प्रमुख पाहुण्यांच्या व श्रीदत प्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपस्थितीत पत्रकारांचे शाल गुलापुष्प नोंदवही पेन मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.

 यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत, श्रीकांत बापू बाविस्कर, लतिफ नदाफ, एन के साळवे तसेच विलास भोसले, श्रीराम भगत, 
राजेंद्र पिसे, समीर सोरटे, सुनील गजाकस, अभिजीत म्हामणे, अभिमन्यू आठवले, उमेश पोतदार, सुनील ढोबळे, आनंद जाधव, मनोज राऊत, हनुमंत माने,आप्पासाहेब कर्चे, हेमंत उराडे आधी पत्रकार बंधू उपस्थित होतेउपस्थित होते सामाजिक कार्याचा वसा घेतलेले श्री दत्त प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी श्री दत्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर चालू असलेले सामाजिक उपक्रम दत्त जयंती सोहळा, संकीर्तन भजन भक्ती भावगीते अन्नदान सेवा वृक्षारोपण रक्तदान शिबिर ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा वेळी वारकऱ्यांना मोफत मिनरल वॉटर आणि फराळ सेवा 
कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान या कार्याची पत्रकार बांधवांनी विशेष कार्यशैलीतून प्रतिष्ठानच्या चालू असलेल्या वाटचालीचे कौतुक केले 
यावेळी पत्रकार बांधवांच्याही आयुष्यात पत्रकारितेची वाटचाल करीत असताना अनेक आणि अडचणी बिकट प्रसंग हाल अपेष्टा अवमान आर्थिक नुकसान याबाबतचे अनुभव पत्रकार बांधवांनी परिसंवादाच्या माध्यमातून मांडले.
 
यावेळी नातेपुतेच्या सामाजिक जडणघडणीत सर्व क्षेत्रात पत्रकार बांधवांचे असलेले मार्गदर्शन आणि समाजा प्रतीची सेवाभावना अत्यंत मौलिक असून जी नेहमी सामाजिक सेवेत वाटचाल करीत असताना श्रीदत्त प्रतिष्ठानला पाठबळ देते आहे असे प्रतिष्ठानचे सचिव नंदकिशोर धालपे यांनी व्यक्त केले , तसेच पत्रकार बांधवांच्या श्रीदत्त प्रतिष्ठानच्या प्रसिद्धी कार्यामुळे अनेकांना यातून यथाशक्ती समाज सेवा करण्याची प्रेरणा मिळते असे नमूद केले
     
यावेळी प्रमुख अतिथी मनोगतात राहुल शेठ पद्मन,  
 विनायकजी उराडे यांनी समायोचित प्रबोधन करून पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच श्रीदत्त प्रतिष्ठानच्या सामाजिक धार्मिक सेवेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 
यावेळी ज्येष्ठ पत्रकार बांधवांच्या वतीने  श्रीकांत बाविस्कर, एन के साळवे, लतीफ नदाफ मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी श्रीदत्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष 
 प्रकाश पद्मन, सचिव नंदकिशोर धालपे, उपाध्यक्ष शिवम उराडे,सहसचिव शक्ती भैय्या पलंगे, खजिनदार रवी ठोंबरे, 
विश्वस्त  संजय चांगण, संजयमामा उराडे, बाळासाहेब राऊत, उमेशजी बरडकर, सागर लोंढे, रवी कोतमिरे, राहुल सोनवळ, अविनाश लिपारे, अक्षय पदमन,रमेश झगडे,  अभिजीत पद्मन, रोहित भरते, ओंकार टेके, तांबोळी 
निहाल नदाफ, सुरज बावकर  आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments