महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत येथील माणकोबावाडी येथे दि. ३१ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधत नाथदेवराई फाउंडेशन वर्धापन दिनानिमित्त महावृक्षदान सोहळा संपन्न झाला. या महावृक्षदान सोहळ्यात ५०० देशी वृक्षांचे वृक्षप्रेमी शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. या सोहळ्याचे आयोजन नाथदेवराई फाउंडेशन व माणकोबावाडी ग्रामस्थ यांनी केले. तसेच विशेष सहकार्य द इकोफॅक्टरी फाउंडेशन पुणे यांनी केले.
सकाळी ९ वाजता हर्ष फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. प्रशांत शेंडगे यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. माणकोबावाडी यवत गावचे सुपुत्र मुरलीधर शिवाजी बिचकुले यांची मुंबई शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल माणकोबावाडी ग्रामस्थ व नाथदेवराई फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाथदेवराई फाउंडेशन सदस्य राहुल बिचकुले यांनी केले. या कार्यक्रमात वृक्षारोपण काळाची गरज, आधुनिक एकत्रित शेती व तरुणांनी व्यवसायात यावे अशा वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. प्रशांत शेंडगे यांनी तरुणांना व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच सध्याचे उष्णतेचे वातावरण आणि भविष्यात निर्माण होणारे धोके यासाठी वृक्षारोपण व असे कार्यक्रम किती महत्वाचे आहेत हे महत्व समजावून सांगितले. समारोप प्रसंगी मनोहर खताळ यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून समारोप केला.
यावेळी पत्रकार आदित्य बारवकर, सिद्धनाथ तरुण मंडळ अध्यक्ष मारुती बिचकुले, बाळू लकडे, नाथु बिचकुले, राघू खताळ, दिपक खताळ, अमोल खताळ, काशिबा बिचकुले, बाळू काळे, सोमनाथ खुपसे, माऊली खताळ, शांताराम बिचकुले, व माणकोबावाडी ग्रामस्थ, नाथदेवराई फाउंडेशन सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments