महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी राजीव रवींद्र गुरव याची राज्यस्तरीय इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शनाकरिता निवड झालेली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ७७ विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर होणाऱ्या प्रदर्शनासाठी झाली आहे. राजीव याने बनवलेल्या ‘मल्टिपर्पज कोकण समृद्ध अपराटस’ या मॉडेल ची निवड राज्यस्तरासाठी झाली आहे.राजीव ने बनवलेल्या मॉडेल च्या साहाय्याने नारळ सोलणे, नारळ फोडणे,नारळ पाणी संकलित करणे,गाळणे,खोबरे खवणे, हिर काढणे, पाती साफ करणे,सुपारी सोलणे, सुपारी फोडणे,केरसुणी बांधणे आदी गोष्टी एकाच यंत्राने करता येत आहेत.त्याच्या ह्या मॉडेल ची दखल घेऊन राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
राजीव गुरव हा इयत्ता १०वी मध्ये शिक्षण घेत आहे.राजीव याला विज्ञान शिक्षक विठ्ठल भोईर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष आनंद साठे, उपाध्यक्ष मनोज शिंदे व इतर संस्था संचालक ,मुख्याध्यापक मनोजकुमार नार्वेकर, पर्यवेक्षक गणेश शिंदे यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.राजीव च्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
1 Comments
Congratulations
ReplyDelete