#Chiplun:अद्यावत आणि सुसज्ज असा 'वैकुंठरथ' चिपळूण शहरासाठी उपलब्ध

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी शिक्षणमहर्षी स्व. गोविंदराव निकम यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब संचलित असलेल्या वैकुंठरथाचे लोकार्पण स्व गोविंदराव निकम जयंती दिनी जिल्हाधिकारी व अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केले.

मतदारसंघाच्या विकासाबरोबर जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी गत दोन अडीच वर्षात अनेक प्रश्न आणि समस्या मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे ज्या ज्या ठिकाणी शासकीय निधीची अडचण निर्माण होते त्या त्या वेळी आपल्या स्वतःच्या खिशातून अथवा सह्याद्रीच्या माध्यमातून सामाजिक काम मार्गी लावली आहेत शहरातील अशीच एक समस्या त्यानी आपल्या माध्यमातून सोडवली आहे.
      
शहराची लोकसंख्या आणि विस्तार ही वाढत आहेत त्या मुळे अनेक प्रश्न आणि समस्या पुढे येत असताना सध्या वैकुंठरथ आवश्यक असल्याचे अनेकांनी आमदार निकम यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या. आमदार निकमानी लगोलग अपक्याकडे असणारी ४०७ रुग्णवाहिका  उपलब्ध करून ती चिपळूण लायन्स क्लबकडे दिली चिपळूण लायन्स क्लबने या वैकुंठरथाची जबाबदारी स्वीकारत त्या मध्ये बदल करीत सुसज्ज असा वैकुंठरथ बनविताना तो आद्यवत पद्धतीने बनविला आहे आमदार शेखर निकम सर यांनी वैकुंठरथाचा मोठा आर्थिक भार उचलला असताना त्याला जोड चिपळूण लायन्स क्लबने देत या वैकुंठरथाची निर्मिती करण्यात आली आहे मात्र यामध्ये आमदार शेखर निकम यांचे योगदान मोठे आहे.
 
     
शिक्षणमहर्षी माजी खासदार स्व गोविंदराव निकम यांच्या समरणार्थ आणि चिपळूण लायन्स क्लब संचलित असणाऱ्या या वैकुंठरथाचे लोकार्पण स्व गोविंदराव निकम यांच्या जयंती दिनी रविवार (दि. १६) रोजी जिल्हाधिकारी त्याच बरोबर आमदार शेखर निकम व अन्य प्रमुख  मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. अतिशय सुबकपद्धतीने हा वैकुंठरथ निर्माण करण्यात आला असून शहरात भेडसावणाऱ्या या  समस्याची सुटका या माध्यमातून होणार आहे लायन्सचे प्रोजेक्ट चेअरमन आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार गोखले यांनी याकमी महत्वाची भूमिका बजावली आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम