#Satara:दहिवडीच्या राजकारणात नातवाने जपला आजोंबाचा राजकीय वारसा...

पत्रकार महेश जाधव यांची नगरसेवक पदाला गवसणी;पक्षनिष्ठेचे मिळाले फळ

महादरबार न्यूज नेटवर्क - एकनाथ वाघमोडे
दहिवडी ता.माण नगरपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेसने माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्तांतर घडवले.या निवडणूकीत व दहिवडीच्या राजकारणात पक्षनिष्ठा राखत आजोबा स्व.डॉ.शामराव जाधव यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचे काम नातू महेश जाधव याने केले आहे.
नगरपंचायतीच्या महत्वपूर्ण लढतीत राष्ट्रवादीतर्फे महेश जाधव यानी भाजपच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करत नगरसेवक पदाला गवसणी घातली आहे.
महेश जाधव यांचे युवासंघटन मजबूत असल्याने लहान वयातच राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत नगरपंचायतीत प्रवेश केला आहे.महेश जाधव यांचे आजोबा स्व.डॉ.शामराव जाधव हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विचार धारेवर तसेच स्व. सदाशिवराव पोळ यांच्या समवेत राष्ट्रवादी पक्षाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. दहिवडी सह माण तालुक्यात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली. मात्र या जाधव परिवाराने राष्ट्रवादी पक्षाची साथ कधीही सोडली नाही.या कुटुंबीयांनी राष्ट्रवादी पक्षाची कायम निष्ठा पाळली. त्याचेच फळ आज महेश जाधव यांना विजयाने मिळाले आहे.

दहिवडी नगर पंचायतीची हि दुसरी टर्म असून या निवडणुकीत अनेक दिग्गज रिंगणात होते.सत्ता आणि पैसा याचे गणित काय असते ते या निवडणुकीवरून संपूर्ण तालुक्याला दिसून आले.यात अनेक मान्यवरांना पराभावाची धूळ चाखावी लागली आहे.मात्र ऐन तिशीच्या महेश जाधव या नवख्या तरुणाने भाजपच्या दिग्गज उमेदवाराचा दारूण पराभव केला.सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी धावून जाणारा व युवकांचा आयडॉल असणाऱ्या महेशला या निवडणूकीत जेष्ठांसह युवकांची मोठी ताकत मिळाली.

राष्ट्रवादीने प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या दिवसापासून शिस्तबद्ध प्रचार करत दहिवडी नगरपंचायतीत अपक्षांना बरोबर घेत सत्ता काबीज केली.प्रभाकर देशमुख यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत,सिद्धनाथ पतसंस्थेचे सुनिल पोळ, माजी उपसभापती दादासो जाधव, तानाजी जाधव, बाळासो गुंडगे, मारुती गलंडे, शामराव नाळे या अनुभवी मंडळींसह युवावर्गाने चांगली साथ दिली.राष्ट्रवादीसाठी हा विजय प्रेरणादायी ठरत आगामी जि.प.पं.स ,म्हसवड नगरपालिका ,सोसायट्या निवडणूकीत ऊर्जा देणारा आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम