#Satara:"दहिवडी कॉलेजमध्ये मतदार साक्षरता दिन उत्साहात साजरा.."

नवमतदार आणि विद्यार्थ्यांनी योग्य उमेदवार पाहून मत न विकता ही प्रक्रिया पार पाडावी- नायब तहसीलदार शैलेश व्हट्टे

महादरबार न्यूज नेटवर्क - एकनाथ वाघमोडे
लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक आधार असलेल्या मतदान प्रक्रियेचा विद्यार्थी वर्गाला आणि नवमतदारांना जाणीव होऊन त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, यादृष्टीकोनातून दहिवडी कॉलेजमध्ये १४वा राष्ट्रीय मतदार साक्षरता दिन साजरा उत्साहात साजरा करण्यात आला.नवमतदारांना मतदान प्रक्रिया समजावी आणि लोकशाही बळकट व्हायला मदत व्हावी या दृष्टीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख या नात्याने  माण तालुक्याचे नायब तहसीलदार शैलेश व्हट्टे हे मार्गदर्शन करताना म्हणाले की नवीन मतदार लोकांना मतदान प्रक्रियेविषयी सहसा माहिती नसते,मतदान करण्याचा अधिकार प्राप्त व्यक्तीने आपलं मत कुणाच्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार पाहून दिले पाहिजे,जो उमेदवार खऱ्या अर्थाने योग्य आणि लोकांची काम करण्यास पात्र असलेल्या व्यक्तीला निवडून देण्यासाठी कटीबद्द असले पाहिजे.आपलं मत कोणत्याही किंमतीला न विकता उमेदवाराची सूज्ञता पाहून मतदान प्रक्रिया पार पाडली पाहिजे.

यावेळी या कार्यक्रमास नायब तहसीलदार आणि निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांसमवेत  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ.एस टी साळुंखे,उपप्राचार्या,डॉ.नंदिनी साळुंखे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी,प्रा.शिंदे के.एस.,राष्ट्रीय छात्र सेनेचे डॉ.लेकुरवाळे,राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.भक्ती पाटील मॅडम,त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मांजरे सर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत