महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे
सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या नगरसेविका म्हणून माळशिरस तालुक्यातील रेश्मा सुरेश टेळे या निवडून आल्या आणि त्यांनी मनसेचे सोलापूर जिल्ह्यातील खाते उघडले त्यामुळे त्यांना मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा शुभेच्छाचा फोन आला होता .रेश्मा टेळे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तसेच मुंबई येथे येण्याचे निमंत्रण दिले होते.
त्यानुसार त्यांनी २फेब्रुवारीला आपले पती मनसे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे सहकुटुंब तसेच मनसेचे पदाधिकारी यांच्या समवेत मुंबई येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आमंत्रण स्वीकारले.तसेच त्यांची भेट घेऊन धनगराची मानाची काठी व घोंगडी भेट देऊन त्यांचा सन्मान केला.तसेच पक्षाच्या कॅलेंडरचेही प्रकाशन करण्यात आले. सदर विजय हा राजसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वाद व दिलीप बापू धोत्रे यांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे,तसेच कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या सहकार्याने झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनसेच्या वतीने मुंबई येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, त्यांच्या स्वागत व सन्मानाने आपण भारावून गेल्याचे मत नूतन नगरसेविका रेश्मा टेळे यांनी व्यक्त केले.
माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत मनसे चे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे यांच्या पत्नी सौ, रेश्मा टेळे या विजयी झाल्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथील एमआयजी क्लब येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी साहेबाना घोंगडी आणि काठी देण्यात आली.
यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे,प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, आकाश होणमाणे,पप्पू तरंगे ,नदीम मुलानी,इत्यादी उपस्थित होते.
0 Comments