#Malshiras:तहसील कार्यालयातील जावेद मणेरी यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करा
माहिती सेवाभावी संस्थेची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे
तहसिल कार्यालय माळशिरस या कार्यालया मध्ये जावेद मणेरी हे गेली 7 वर्षा पासुन कारकून अव्वल कारकून या पदावर कार्यरत आहेत . तसेच कोतवाल या पदावर ते येळीव व पुरंदावडे येथे सेवा बजावत असताना देखील आपण त्यांना कशाच्या आधारे तहसिल कार्यालयाचे सक्षम अधिकारी तहसीदार यांचे डिजीटल स्वाक्षरी दिली आहे . तहसिदार यांच्या डिजीटल सहिचा गैर वापर होताना दिसुन येत आहे ? कारण माळशिरस तालुक्यामध्ये महाई सेवा केंद्र / आपले सरकार सेवा केंद्राची शासनाने गावोगावी सोय केलेली असुन त्या ठिकाणी महाई . सेवा केंद्रातील ठरावीक लोकांचीच काम हाती घेवून वेळेवर केली जात असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तरी आपण आपल्या डिजीटल सहीचा अधिकार का ? व कशासाठी जावेद मणेरी या खाजगी ऑपरेटर यांच्याकडे दिलेला आहे.
याची या सर्व प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी त्या मध्ये सेतू सुविधा केंद्र / महा ई सेवा केंद्र /आपले सरकार सेवा केंद्रा कडुन यांच्याकडे किती दाखले पाठवण्यात आले ते परत किती दिवसानंतर दिले गेले याची चौकशी करावी . कारण या कार्यालयाच्या व आपल्या डिजीटल सहीच्या नावाखाली दररोज हजारो रुपयाचा भष्ट्राचार होत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसुन येत आहे ? तसेच तहसिलदार या नात्याने आपले जावेद मणेरी खाजगी ऑपरेटर यांच्यावर कोणतेही नियंत्रण दिसुन येत नाही व जावेद मणेरी यांचा मनमानी कारभार या ठिकाणी दिसून येत आहे हा इसम स्वतःच्या ( वैयक्तकि व आर्थीक ) हितसंबंध असणाऱ्याच महाई सेवा केंद्र / आपले सरकार सेवा केंद्र यांचे दाखले वेळेवर प्रमाणीत करत असताना दिसुन येत आहे या सर्व प्रकरणाकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहात हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे .
ज्या महा ई सेवा केंद्र / आपले सेवा केंद्र यांचे जावेद मणेरी यांच्याशी कोणतेही हितसंबंध नाहीत त्या महा ई सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांचे दाखले कित्येक दिवसापासुन या कार्यालयाच्या खात्यात प्रलंबित आहेत सदर बाबीमुळे शालेय विद्यार्थी / अर्जदार यांचे अकल्पनीय नुकसान होत असुन आपण यावर लक्ष केंद्रित करावे व सदर प्रश्न मार्गी लावून तात्काळ जावेद मणेरी यांची तहसिल कार्यालयातुन हक्कलपट्टी करावी महा ई सेवा केंद्र हे एकाच ID वरती ठिकठिकाणी सुरू आहेत याची ही चौकशी करण्यात यावी . तसेच जावेद मणेरी यांची गेल्या 7 वर्षापासुन ज्या पदावर काम केले आहे त्या सर्व ठिकाणच्या कामाची खातेनिहाय चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी हि विनंती . अन्यथा दि : 08/02/2022 रोजी आपल्या कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांची राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे.
सदर निवेदनाच्या माहितीसाठी प्रति विभागीय आयुक्त सो पुणे, जिल्हाअधिकारी सो सोलापूर, उपजिल्हाअधिकारी सो सोलापूर, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलुज व माळशिरस पोलीस स्टेशन माळशिरस यांना देण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment