#Malshiras:कै. भानुदास झंजे यांच्या पुण्याईने अनिल भानुदास झंजे सर्वात जास्त मते मिळवून विजयी


श्री काळभैरवनाथ पॅनलच्या१३-० दणदणीत विजय.                                                                                
महादरबार न्यूज नेटवर्क -
मेडद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित मेडद, ता. माळशिरस या सेवा संस्थेची    स्थापनेपासून आज पर्यंत एकदाही निवडणूक लागलेली नव्हती .कै. भानुदास चंद्रकांत झंजे यांनी अथक परिश्रम घेऊन प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली. त्यांना गावातील कुठल्याही माणसानं विरोध केला नाही.गावातील प्रत्येकजण त्यांना देवमाणूसच म्हणून ओळखत होते. ते गेल्यानंतर पहिल्यांदा सन २०२१--२०२२ ते  २०२६--२०२७या सालाकरिता पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे. श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनल व श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये १३ जागांसाठी२६ उमेदवार उभे राहिलेले आहेत.

श्री काळभैरवनाथ पॅनलचे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव तुपे, ज्येष्ठ नेते दादासाहेब जगताप, शंकरराव काळे, विजयराव तुपे, विद्यमान उपसरपंच शिवाजी लवटे, सदस्य अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  १३-० असा दणदणीत विजय  झाला.

सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटातसोपान महादेव हंगे -१४६, अमर लालासो जगताप १५०, आनंता गोविंद काळे १४७ , विष्णू विठ्ठल पवार १४५, भास्कर लक्ष्मण तुपे१४६, विठ्ठल कुंडलिक यादव १४०, अनिल भानुदास झंजे१५३, सूर्यकांत निवृत्ती झंजे १४२असे आठ उमेदवार आहे. महिला प्रतिनिधी गटात रेखा राजाराम तुपे१४९, संगीता अनिल झंजे१४७, अनुसूचित जाती जमाती गटात शिवाजी लक्ष्मण भिसे१६२, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटार सचिन सोपान लवटे १७२ इतर मागास प्रवर्ग गटात आप्पा तुकाराम सोनटक्के१६५  असे   विजय १३उमेदवार आहेत.मेडद विविध कार्यकारी सेवा संस्थेची स्थापना १९४९ साली झालेली आहे. संस्थेचे ४२२ सभासद आहेत. त्यापैकी मतदानाला ३१३ सभासद पात्र आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयाची आहे. संस्था नेहमी १००% वसुली करत असते. संस्थेचा डिव्हीडंट वाटप केला जातो. . स्थापनेपासून सत्ताधारी गटाने एक हाती संस्थेवर वर्चस्व ठेवलेले आहे. 

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम