#Malshiras:कै.नानासाहेब आबाजी कर्णवर-पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण व कै.तुकाराम आबाजी कर्णवर पाटील यांच्या स्मरणार्थ विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न


१६० रक्तदात्यांनी केले रक्तदान,२४० गरजूंनी केली डोळे तपासणी

महादरबार न्यूज नेटवर्क -
गोरडवाडी(ता.माळशिरस)येथील कै.नानासाहेब आबाजी कर्णवर-पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण व कै.तुकाराम आबाजी कर्णवर पाटील यांच्या स्मरणार्थ दि.२७ मे २०२२ रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ८ ते ९ वा. - श्राध्द विधी श्री. शरद काका वझे, माळशिरस यांच्या शुभहस्ते करण्यात आले नंतर  सकाळी १० ते १२ वा.- ह.भ.प.गुरुभक्ती भूषण हरिहरनंदन महाराज, पिलीव यांचे सुश्राव्य किर्तन झाले तसेच सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे त्यामुळे रक्तदान करण्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घेतला यात  १६०  रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदानासाठी अक्षय ब्लड बँक सोलापूर यांचे सहकार्य लाभले  तसेच सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत मोफत   आरोग्य तपासणी शिबिर  घेण्यात आले  या शिबिरात २४० गरजूंचे डोळे तपासण्यात आले .या शिबिरासाठी  बुदाणी हॉस्पिटल (के.के.आय.), पुणे यांचे सहकार्य लाभले. यातील १४ जणांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्याचे सांगितले.
दुपारी २ ते ४ वा. - गजी ढोल नृत्य कार्यक्रम हा परमपुज्य देवाजे मामा हेरवाडकर महाराज, मानगाव यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आला यामध्ये धुळदेव,मायणी,गोरडवाडी, मोटेवाडी निकमवाडी या गावांनी सहभाग घेतला होता सायं. ४ ते ५ वा.- वृक्षरोपन कार्यक्रम हा ह.भ.प. अविनाश महाराज साळुंखे, शिरूर यांच्या शुभहस्ते  करण्यात  आला तसेच वृक्ष वाटप ही करण्यात आले. तसेच भोजन ही ठेवण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन कर्णवर-पाटील परिवार, सर्व ग्रामस्थ, युवक व भजनी मंडळ गोरडवाडी यांनी केले असून कार्यक्रमाचे निमंत्रण 
श्री.बाळासाहेब नानासाहेब कर्णवर-पाटील व्हाईस चेअरमन, सदगुरु श्री श्री साखर कारखाना राजेवाडी, ता.आटपाडी, जि. सांगली,
श्री.सोमनाथ तुकाराम कर्णवर-पाटील सहाय्यक पोलिस निरिक्षक, ठाणे शहर
यांनी दिले होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत