#Natepute:नातेपुते पोलीस स्टेशन समोर माहिती सेवाभावी संस्थेचे (IMDS.LTD) यांच्याविरोधात धरणे आंदोलन सुरू


जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आंदोलनकर्त्यांची भूमिका

महादरबार न्यूज नेटवर्क -
इन्स्टिट्यूट ऑफ महा ई लर्निंग अँड डिग्निटी स्किल डेव्हलपमेंट लिमिटेड (IMDS LTD.) चे संस्थापक अमोल गोविंद शिंदे व जिल्हा डेव्हलपमेंट अधिकारी ज्ञानेश्वर कृष्णा जाडकर (नातेपुते) यांनी आस्मा इलाहीबकक्ष मुलाणी, सौ.सलमा इलाहीबक्ष पक्ष मुलाणी रा. नातेपुते ता. माळशिरस व नूरमोहम्मद अ रज्जाक मुलाणी रा. सोनके तालुका पंढरपूर यांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली व मानसिक त्रास दिला त्यासंदर्भात माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून धरणे निदर्शने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात महेंद्र साठे, सचिन रणदिवे आस्मा मुलाणी, ईलाहीबक्ष मुलाणी, वाल्मीक रणदिवे अरसलान आगा,
तसेच आधी मान्यवर सहभागी झाले आहेत.

इन्स्टिट्यूट ऑफ महा ई लर्निंग अँड डिग्निटी स्किल डेव्हलपमेंट लिमिटेड चे संस्थापक अमोल गोविंदराव शिंदे (शाखा- नेरूळ, मुंबई. व जिल्हा डेव्हलपमेंट अधिकारी ज्ञानेश्‍वर कृष्णा जाडकर (शाखा -नातेपूते, सोलापूर, यांनी दिलेल्या माहितीनुसार आय एम डी एस लिमिटेड ही कंपनी महाउद्योजक घडविण्याचे काम करते. आय एम डी एस लिमिटेड नवीन व होतकरू लोकांना उद्योग उपलब्ध करून देते त्यामध्ये डिपॉझिट म्हणून कंपनी उद्योजकांकडून २ लाख ते ३५ लाखापर्यंतची रक्कम आगाऊ घेते व त्यानुसार त्या उद्योजकाला पूर्ण वर्षभर कच्चामाल पुरवणे, वर्षभराचे बारा महिन्याचे मानधन देणे तसेच प्रकल्प साठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देणे आणि उद्योजकाने तयार केलेला पक्का माल याची स्वतः आय एम डी एस विक्री करते अशा प्रकारची माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही सर्वांनी काहीतरी अर्थार्जन होईल या हेतूने आय एम डी एस लिमिटेड मध्ये  रिटायरमेंट फंड,सोने तारण, खाजगी सावकारी व्याजाने, अशा वेगवेगळ्या पद्धतीने कर्ज काढून ती रक्कम आय एम डी एस लिमिटेड महा उद्योजक डिपार्टमेंटला भरली.
                      
परंतु रक्कम भरताना ज्या पद्धतीने आम्हाला माहिती सांगण्यात आली किंवा आभास निर्माण करण्यात आला त्याचा आम्हाला पूर्णपणे उलटा अनुभव आला. आय एम डी एस लिमिटेड ही कंपनी उद्योजकांकडून ज्या गोष्टी सांगून पैसे घेते त्या कोणत्याही बाबी पूर्ण करत नाही. आम्हाला वेळोवेळी कच्चामाल मिळवण्यासाठी,  तयार केलेला पक्का माल कंपनी घेऊन जाण्यासाठी, मशिनरी दुरुस्त करून देण्यासाठी तसेच आम्हाला मासिक नफा मिळवण्यासाठी देखील कंपनीच्या आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खूप पाठीमागे लागावे लागते, प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते.  पूर्ण वर्षभरात फक्त एक ते दोन महिन्याचा मासिक नफा आम्हाला मिळाला आहे. आम्ही आमच्या कर्जाचे हप्ते भागवण्यासाठी कंपनीला आणि पदाधिकाऱ्यांना विनंती केली असता कोणताही सकारात्मक उत्तर आम्हाला मिळाले नाही किंवा सहकार्य करण्यात आले नाही. आम्ही वैयक्तिक भेट घेऊन,फोन कॉल द्वारे, व्हाट्सअप द्वारे, ई-मेल द्वारे, कंपनीच्या हेल्प लाईनद्वारे तसेच लेखी पत्राद्वारे देखील संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु कंपनीने त्यावर ती आम्हाला कोणतही उत्तर देण्यास टाळले शिवाय आमचे रजिस्टर पत्र घेण्यात देखील आले नाही, उलट कंपनीची डेव्हलपमेंट चालू आहे, कंपनी नवीन सिस्टम राबवत आहे, उद्योजकांच्या चुकीमुळे कंपनीचे नुकसान होत आहे, वेंडर कडून कच्चामाल खराब आला आहे तसेच आम्हाला वारंवार स्थगिती ची तिची भीती दाखवणे, असे प्रकार करून आमची आर्थिक फसवणूक व खूप मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास आय एम डी एस लिमिटेड आणि त्याचे पदाधिकारी ज्ञानेश्वर कृष्णा जाडकर व अमोल गोविंदराव शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 तरी आम्हा सर्वांची आपणास विनंती आहे की आम्ही जी रक्कम आय एम डी एस महा उद्योजक ला भरली आहे ती रक्कम ,आम्हाला करावयास लावलेला अनावश्यक इतर खर्च व आमची रक्कम आम्हाला आमच्या  झालेल्या नुकसाना सहित परत मिळावी या मागणीसाठी आजपासून माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ लगड यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र साठे यांच्या नेतृत्वाखाली धरणे निदर्शने आंदोलन सुरु करण्यात आले आहे. निवेदन देऊन आठ दिवस झाले तरी अद्याप पर्यंत कोणतीही दखल न घेतल्यास कारणाने हे आंदोलन करण्याची वेळ आली आहे असे आंदोलन कर्ते यांनी बोलताना सांगितले जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका आंदोलन कर्ते यांनी घेतली आहे.

या निवेदनाच्या प्रती मा.जिल्हाधिकारी सो सोलापूर, मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सो नातेपुते पोलीस स्टेशन नातेपुते यांना दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत