#Solapur:प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण


महादरबार न्यूज नेटवर्क -
आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी मंगळवारी (दि.३१मे) ऑनलाईन संवाद साधणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याने तयारी करण्याच्या सूचना केंद्रीयस्तरावरून मिळालेल्या असल्याने सोलापूर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण नियोजन केले आहे.

काटेकोर नियोजनासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर संबंधित विभागाची वेळोवेळी आढावा बैठक घेऊन सूचना देत आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून सूचना करीत आहेत. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सहभागी विभागांनी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार केले आहेत. प्रातिनिधीक स्वरूपात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन आणि अमृत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत हेल्थ आणि वेलनेस सेंटर, प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यासाठी योजनेचे संबंधित विभाग २० ते २५ लाभार्थी कार्यक्रमाला घेऊन येणार आहेत. यामुळे सुमारे २५० ते ३०० लाभार्थी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

हुतात्मा स्मारक येथे ऑनलाईनद्वारे लाभार्थी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्याशी संवाद साधणार आहेत. याबाबत समन्वय अधिकारी श्री. स्वामी यांनी गुरूवारी (दि.२६) सायंकाळी हुतात्मा स्मारक येथे स्टेज व्यवस्था, बैठक व्यवस्था, पाहुण्यांची व्यवस्था, साऊंड सिस्टीम, लाईव्ह कार्यक्रमांची सविस्तर माहिती घेऊन संबंधितांना सूचना दिल्या आहेत.



Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम