#Chiplun:प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ओवळी, वालोटी, कळकवणे गावांचा पाणीप्रश्न मार्गी
चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण तालुक्यातील ओवळी, वालोटी, कळकवणे गावात गेले खुप दिवस पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. याबाबत ग्रामस्थांची पाणी प्रश्नाबाबत सततची मागणी होती. याचा विचार करता “जलजीवन मिशन अंतर्गत” माननीय श्री. गुलाबराव पाटील, पाणी पुरवठामंत्री, माननीय श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री यांच्याकडे या पाणीप्रश्नाबाबत आमदार शेखर निकम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रु. १२ कोटी ८१ लाख ६०हजार चा निधी मंजुर झाला आहे.
महाआघाडीच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत खास बाब म्हणून हा निधी मंजुर झाल्याने आमदार श्री. शेखर निकम यानी मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मा. महसुलंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment