#Yavat:अंधत्वाला कमजोरी न समजता यशस्वी झालो व मंत्रालयात नोकरी लागली - राम लवांडे



महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
अंधत्वावर मात करत जिद्दीने काटेरी प्रवास केला. कोणतीही गोष्ट मिळताना प्रतिक्षा करावी लागली. दुःख आणि अपमान सहन करत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले असा राम लवांडे यांनी खुटबाव, ता. दौंड येथे संतराज कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपला जीवन पट उलगडला.

पुढे ते म्हणाले, विद्यार्थ्यांनो तुम्हीही प्रयत्न करा. यश मिळण्यासाठी चिकाटी व संयम गरजेचा असतो. सध्या मी मोबाईल, लॅपटॉप सफाईदारपणे वापरतो. त्याचा मला खूप फायदा झाला. एमपीएससीद्वारे मंत्रालयात नोकरी लागल्यानंतर आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. राम लवांडे हे दौंड तालुक्यातील खोर येथील रहिवासी आहेत. सध्या मुंबई मंत्रालयात गृह खात्यात ते कार्यरत आहेत. ते एमपीएससीची आणखी कर सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण झाल्याने  या पदाची देखील दिवाळीनंतर संधी असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

एमकेसीएलचे विभागीय अधिकारी विश्वजित उत्तरवार, पुणे जिल्हा समन्वयक सुरज लाकाळ, साधू सूळ, भूषण शेलार व खुटबाव परिसरातील एमएस-सीआयटीचे विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत