Hot Posts

6/recent/ticker-posts

#Parbhani:पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी शेषेराव सोपने यांची निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -
पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना  यादीवर नसलेल्या वृत्तपत्राला पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती  पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची स्वतंत्र चौकशी पत्रकारांना धमकी मारहाण हल्ला राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी  राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता  त्याचबरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आर्थिक मदत  इत्यादी विषयावर पत्रकार सुरक्षा समिती  प्रभावीपणे काम करत असून पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण निवेदन राज्य सरकारला सादर करून पत्रकाराला न्याय देण्याची भूमिका पार पाडत आहे.
 
पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी  परभणी जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार  जनतेचा दरबार यूट्यूब व पोर्टल चे संपादक शेषेराव सोपने यांची निवड करण्यात आली असून शेषेराव सोपने हे पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका बजावली असून सर्व पत्रकारांना सोबत घेऊन काम करणारे  पत्रकारिता क्षेत्रात आपले आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे शेषेराव सोपने यांची पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून पत्रकारांच्या   मूलभूत प्रश्‍नांची जाणीव असणारे  ज्येष्ठ पत्रकार व संपादक शेषेराव सोपने यांच्या निवडीने परभणी जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून एका ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकार यांची निवड झाल्याने पत्रकारांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी शेषेराव सोपने यांना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार  राज्य कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे, राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना, मराठवाडा विभाग अध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष यशवंत कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अप्पासाहेब कर्चे,  पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बळीराम पवार,  सोलापूर जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार,  महिला विभाग अध्यक्ष सुवर्णा सुना,  सोलापूर जिल्हा संघटक दत्तात्रय पवार, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मनोज जैन, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी तसेच पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments