#Baramatiलोणारी समाज एकसंघ करण्यासाठी सर्वतोपरी लागेल ती मदत व सहकार्य सदैव करणार - रवींद्र भाऊ धंगेकर


महादरबार न्यूज नेटवर्क -       
बारामती येथे अखिल भारतीय लोणारी समाज सेवा संघाची नवीन कार्यकारणी व समाजातील अनेक अडचणीवर मात करण्यासाठी बैठक संपन्न झाली.

यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले व नूतन समाज सेवा संघाच्या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय लोणारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष पुणे महानगरपालिकेचे सभासद रवींद्र भाऊ धंगेकर म्हणाले आगामी काळामध्ये संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर अखिल भारतीय लोणारी समाज सेवा संघाचे जाळ उभा करून सर्वसामान्य गोरगरीब खचलेल्या पिचलेल्या समाज बांधवांना लागेल ती मदत आपण सर्वांनी मिळून करूया दऱ्याखोऱ्या मध्ये रानावनात विखुरलेला हा समाज एकसंघ व संघटित करण्यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. समाजातील तरुण सुशिक्षित युवकांनी पुढे येऊन समाज लढ्याची ही चळवळ अधिक वेगाने आपणास पुढे न्यायची आहे व त्यासाठी आपण सर्वांनी खंबीरपणे समाज सेवा संघाच्या पाठीशी उभे राहावे तमाम लोणारी समाज बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येते की, 
लोणारी समाज  संघटना बारामती शहर कार्यरत करण्यात आली..
 
या बैठकीसाठी अखिल भारतीय लोणारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष पुणे महानगरपालिकेचे सभासद नगरसेवक रवींद्र भाऊ धंगेकर, लोणारी मठ पंढरपूर चे अध्यक्ष भाऊसाहेब गोडसे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्धार्थ भाऊ गीते, कृष्णाई इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक तानाजीराव कर्चे सर, अखिल भारतीय लोणारी समाज सेवा संघाचे सचिव रवींद्र होळकर सर, अखिल भारतीय लोणारी समाज सेवा संघाचे खजिनदार अविनाश कर्चे ,मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडी अध्यक्ष कारंडे ताई इत्यादी मान्यवरांसह तमाम लोणारी समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या.

                     Advertisement

तसेच या बैठकी मध्ये एकमताने ठराव मंजूर करून पुढील कार्यकारणी सदस्य जाहीर करण्यात आले...
अमोल दिलीप कुलट
अध्यक्ष:- लोणारी समाज संघटना बारामती  किरण तात्यासाहेब कारंडे
उपाध्यक्ष - लोणारी समाज संघटना बारामती शहर ,श्री. तात्यासाहेब राणे - उपाध्यक्ष - लोणारी समाज संघटना बारामती शहर ,
ॲड. अनिल होळकर
 कार्याध्यक्ष- लोणारी समाज संघटना बारामती शहर ,
पै. गणेश दत्तात्रय आटपडकर
  सह- कार्याध्यक्ष- लोणारी समाज संघटना बारामती शहर ,
 धनेश किसन कर्चे
सचिव- लोणारी समाज संघटना बारामती शहर,
  प्रकाश कर्चे
प्रसिद्धी प्रमुख:- लोणारी समाज संघटना बारामती शहर ,
दत्तात्रय सदाशिव कर्चे
 खजिनदार - बारामती लोणारी समाज संघटना बारामती,
कैलास कर्चे
सह-खजिनदार - बारामती लोणारी समाज संघटना ,ॲड. भालचंद्र होळकर
 कायदेशीर सल्लागार - लोणारी समाज संघटना,

निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम